महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लाखो भाविक शिर्डीत दाखल, साई मंदिर आज राहणार रात्रभर खुलं - विद्युत रोषणाई

Saibaba Temple Shirdi : सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागताला साई बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येणाऱ्या भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी साई मंदिर आज (31 डिसेंबर) 24 तास खुलं राहणार आहे.

on occasion of new year shirdi sai baba temple open 24 hours today
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लाखो भाविक शिर्डीत दाखल, साई मंदिर आज राहणार रात्रभर खुले

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 31, 2023, 1:55 PM IST

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लाखो भाविक शिर्डीत दाखल, साई मंदिर आज राहणार रात्रभर खुले

शिर्डी Saibaba Temple Shirdi : नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनानं व्हावी. यासाठी लाखो भाविक आज (31 डिसेंबर) साईबाबांच्या शिर्डीत दाखल होत आहे. या भाविकांना साईबाबांचं सुखकर दर्शन व्हावं, यासाठी संस्थानच्या वतीनं आज रात्रभर साईबाबांचं मंदिर दर्शनासाठी खुलं ठेवण्यात येणार आहे. नवीन वर्षानिमित्त दर्शन घेण्यास येणाऱ्या भाविकांनी शिर्डीत मोठी गर्दी केली आहे.


देश-विदेशातून भाविक शिर्डीत दाखल : 2024 नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असलेल्या साईबाबांच्या पुण्यभूमीत अर्थातच शिर्डीत देश विदेशातून लाखो भाविक साईचरणी नतमस्तक होण्यासाठी दाखल झाले आहेत. नववर्षानिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळं मंदिर आणि मंदिर परिसर उजाळून गेला आहे. तसंच साईमंदिरात आणि मंदिर परिसरात देशी आणि विदेशी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

भाविकांसाठी रात्रभर मोफत चहा-बिस्कीटची व्यवस्था :आज वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी अडीचपट वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता, मंदिर ट्रस्टनं मंदिर 24 तास खुलं ठेवण्याचा निर्णय घेतलाय. इतकच नाही, तर दर्शन रांगेतील भाविकांसाठी रात्रभर मोफत चहा, बिस्कीटची व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच व्हिआयपी दर्शन पासेससाठी रात्री सेवा उपलब्ध करून देण्यात आलीय. दरम्यान, शहरातील वाहतूक सुरळीत रहावी, यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालं असून नगर-मनमाड मार्गावरील वाहतूक रिंगरोडनं वळविण्यात आली आहे.



भाविकांसाठी साईभजन संध्या कार्यक्रमाचं आयोजन :साई मंदिर परिसराजवळचा परिसर नो व्हेईकल झोन करण्यात आल्यानं भाविकांना रस्त्यानं पायी चालणं सुलभ होत आहे. साईबाबा संस्थानचे भक्तनिवास फुल्ल झाल्यानं संस्थाननं उभारलेल्या मंडपात भाविकांनी आश्रय घेतला आहे. तसंच साई संस्थानच्यावतीनं भाविकांसाठी साईभजन संध्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.



हेही वाचा -

  1. साईबाबांच्या दर्शनाकरिता गुरूभक्तांची गर्दी ; दत्तजयंतीनिमित्त राज्यभरातून 140 पालख्या शिर्डीत दाखल
  2. सलग सुट्ट्यांमुळं साईबाबांची शिर्डी भक्तांनी गेली फुलून; मंदिर रात्रभर राहणार खुले
  3. शिर्डीत 'नो मास्क, नो एन्ट्री' फलकावरून भाविकांमध्ये गोंधळ, फलक लावला अन् काही वेळात काढूनही टाकला

ABOUT THE AUTHOR

...view details