अहमदनगर :साईबाबांच्या शिर्डीतील पुण्यतिथी उत्सवाचा मुख्य दिवस (Saibaba temple in Shirdi will remain open) असल्याने, साई दर्शनासाठी भाविकांनी रात्रीपासुनच गर्दी केली आहे. साईबाबांची पुण्यतीथी म्हणुन चार दिवस हा उत्सव साजरा करण्यात येतो. 15 ऑक्टोबर 1918 साली दस-याच्या दिवशी बाबांनी समाधी घेतली होती. त्यामुळे बाबांचं स्मरण करताना लाखो भाविक साई समाधीवर आज नतमस्तक (darshan today on Dussehra Festival) होत आहे.
Dussehra 2022 : साईभक्तांसाठी खूशखबर! आज शिर्डीतील साईबाबा मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले राहणार - आज शिर्डीतील साईबाबा मंदिर
15 ऑक्टोबर 1918 साली दस-याच्या दिवशी बाबांनी शिर्डी येथे समाधी (darshan today on Dussehra Festival) घेतली होती. आज साईबाबा पुण्यतिथी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर साईमंदिरासह परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. तर दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या आहे. तेव्हा आज शिर्डीतील साईबाबा मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले (Saibaba temple in Shirdi will remain open) राहणार आहे.
आकर्षक सजावट : सलग चार दिवस हा उत्सव चालतो. मुंबई येथील व्दारकामाई मित्र मंडळाने स्वखर्चाने उभारलेला साई दरबार देखावा यावेळी भाविकांच लक्ष वेधुन घेत आहे. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. साई मंदिराला आकर्षक केशरी आणि पिवळ्या झेंडुच्या फुलांचं तोरण तसेच सजावट करण्यात आलीय. साईबाबांच पुण्यस्मरण करताना बाबांचा आराधना विधी करण्यात आला. आज उत्सवाचा मुख्य दिवस असल्यान लाखो भाविंकांची मांदीयाळी शिर्डीत पहावयास मिळत आहे.
104 वा पुण्यतीथी उत्सव : साईबाबांनी 15 आँक्टोबर 1918 रोजी आपला मानवी देह ठेवला, तेव्हापासुन शिर्डीत साईभक्त पुण्यतिथी उत्सव साजरा करतात. यावर्षीचा हा 104 वा पुण्यतीथी उत्सव आहे. आज सकाळपासुनच इथे मंगलमय वातावरण दिसुन येत आहे. उत्सवाचा मुख्य दिवस असल्यान भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता, आज साईबाबा संस्थान मंदीर दर्शनासाठी रात्रभर खुल ठेवले आहे.Dussehra 2022