अहमदनगर(शिर्डी) : Saibaba Sansthan Trust : गेल्या दोन दिवसापूर्वी साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवशंकर (P. Shiva Shankar) यांनी साई संस्थानला एखाद्या संस्थेने पाच एकर जागा देण्याची तयारी दर्शविल्यास, साई संस्थान तिथं (Saibaba Sansthan Trust) प्रति शिर्डी निर्माण करेल, असं सांगितलं होतं. तसंच त्यासाठी पन्नास लाख रुपये खर्च केले जातील, असा निर्णय जाहीर केला होता. मात्र, हा निर्णय योग्य नसल्याचं शिर्डीकरांनी म्हटलं आहे.
भक्तांना अधिक सुविधेची गरज : मुळात शिर्डीच्या साई मंदिरात (Shirdi Sai Temple) तसेच परिसरात भक्तांना अधिक सुविधेची गरज आहे. याच बरोबरीनं शिर्डीत असलेल्या रुग्णालय आणि शैक्षणिक संस्थाच्या कारभारातही अनेक उणीवा आहेत. देशभरातून शिर्डीत उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना सुविधा देत त्यांच्यावर उपचार होणे गरजेच आहे. शिर्डीत भक्तांना साई दर्शनानंतर विरंगुळा म्हणून साई थिम पार्कही रखडलेला असताना, साई संस्थानं मंदिरं बांधण्याचा खटाटोप करू नये, असेही कैलास कोते यांनी सांगितलं.
मंदिर कारभारातच नवनवीन घोटाळे : शिर्डीच्या साईबाबांचे जगभरात अनेक मंदिरं भक्तांनी बांधली आहेत. त्याचे मँनेजमेंट तेथील स्थानिक लोक बघतात. शिर्डीच्या साई संस्थाने नव्या स्कीम अंतर्गत मंदिरं बांधत तेथील मंदिरांचा कारभार पाहाणार असल्याचे जाहीर केलंय. मात्र, शिर्डीच्या मंदिर कारभारातच रोज नवनवीन घोटाळे बाहेर निघत असताना साई संस्थान देशभरात उभारल्या जाणाऱ्या मंदिराचं मॅनेजमेंट कसं बघू शकेल? असा प्रश्नही कैलास कोते यांनी उपस्थित केलाय.
शिर्डीकरांनी दिला अभिप्राय : देशभरात मंदिरं बांधताना एखाद्या संस्थेने मागणी केल्यानंतर पन्नास लाख रुपये खर्च करण्याची तयारी साई संस्थानने दाखवली आहे. मुळातच साई संस्थानचे उत्पन्न हे वर्षाकाठी सहाशे कोटीच्या आसपास आहे. त्यातून खर्च जाऊन दीडशे कोटी शिल्लक राहतात. संस्थानची गंगाजळी ही तीन हजार कोटींच्या जवळपास असली तरी संस्थानच्या खर्चात दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेक मोठे प्रकल्प ही संस्थानला हाती घ्यायचे आहेत. त्यामुळे साई संस्थानकडे मंदिरं उभारण्याची मागणी अनेकांकडून होऊ शकते. त्यामुळे तितका निधी संस्थानकडे असेल का? हाही प्रश्न आहेच. साई संस्थानने हा प्रकल्प सुरू करण्याआधी शिर्डीकर आणि साई भक्तांचे अभिप्राय ceo.ssst@sai.org.in या वेबसाईटवर मागवण्यात आले होते. त्यावर आता शिर्डीकरांनी संस्थान ही योजना मागे घ्यावी, अशीच मागणी केली आहे.
हेही वाचा -
- Shirdi Saibaba Trust Donation Problem : भाविकाला दिल्या एकाच नंबरच्या दोन पावत्या, साईभक्तांची फसवणूक
- Sai Charitra Parayan : शिर्डीत साई चरित्र पारायणाची सांगता....
- Shirdi Saibaba Temple : शिर्डी साईबाबा मंदिरात हार, फूल, प्रसादावरील बंदी हटणार, साई संस्थान समितीचा निर्णय