शिर्डी :साईबाबांच्या शिर्डीतील चार दिवशीय पुण्यतिथी उत्सवाला आज भक्तीमय वातावरणात सुरुवात (Saibaba death anniversary celebration first day) झाली. पहाटच्या काकड आरती नंतर साईप्रतीमा, वीणा आणि साई सतचरित्राची साईसमाधी मंदीर ते व्दारकामाईपर्यंत सवाद्य मिरवणुक काढण्यात (Saibaba Death Anniversary) आली. यावेळी संस्थानचे तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी विणा, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी पोथी आणि रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक ले. कर्नल डॉ. शैलेश ओक व सामान्य प्रशासन प्र. अधिक्षक नवनाथ कोते यांनी प्रतिमा घेवुन सहभाग घेतला. यावेळी प्रातांधिकारी गोविंद शिंदे, तहसिदार कुंदन हिरे, मुख्य लेखाधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी कैलास खराडे, संरक्षण अधिकारी आणासाहेब परदेशी, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, पुजारी, कर्मचारी, साईभक्त आणि ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित (Saibaba death anniversary in Shidi) होते.
Saibaba Death Anniversary : भक्तीमय वातावरणात साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाला सुरुवात - साईबाबा पुण्यतिथी
साईबाबांच्या शिर्डीतील चार दिवशीय पुण्यतिथी उत्सवाला आज भक्तीमय वातावरणात सुरुवात (Saibaba death anniversary celebration first day) झाली. पहाटच्या काकड आरती नंतर साईप्रतीमा, वीणा आणि साई सतचरित्राची साईसमाधी मंदीर ते व्दारकामाईपर्यंत सवाद्य मिरवणुक काढण्यात (Saibaba Death Anniversary) आली.
उत्सवाचा पहीला दिवस -आज उत्सवाच्या पहील्या दिवशी द्वारकामाईत साईचरीत्राच्या अखंड पारायणास सुरवात झाली. यावेळी प्रथम व व्दितिय अध्यायाचे पठण संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी केलं. साईंच्या मंगलस्नानानंतर साईबाबा संस्थानचे तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सप्तनीक साईंची पाद्यपुजा केली. साईंच्या मुर्तीला आज सोन्याच्या अलंकाराने सजवण्यात आलंय. उत्सवात भाविक मोठया प्रमाणात सहभागी झाले आहेत. चार दिवस हा उत्सव चालणार असून मुंबई येथील व्दारकामाई मित्र मंडळाने स्वखर्चाने श्री साई दरबार हा भव्य देखावा साकारला असुन हे प्रवेशद्वार भाविकांचं लक्ष वेधुन घेत आहे. उत्सवाच्या निम्मिताने साई मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईने नटवले आहे. तसेच हैद्राबाद येथील देणगीदार साईभक्त ए. महेश रेड्डी यांच्या देणगीतुन मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली (Saibaba death anniversary celebration first day) आहे.
मंदीर दर्शनासाठी रात्रभर खुले -उद्या उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने लाखो भाविंकांची मांदीयाळी शिर्डीत पहावयास मिळणार आहे. यावर्षीचा हा 104 वा पुण्यतीथी उत्सव आहे. या वर्षाच्या उत्सवास मंगळवार सकाळपासुन मंगलमय वातावरणात सुरुवात झाली. बुधवारी दसऱ्याला साई निर्वाणाचा दिवस अर्थात पुण्यतिथी उत्सवाचा मुख्य दिवस आणि असल्याने भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता साईबाबा संस्थानने साई मंदीर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. साईबाबा संस्थानने उत्सवाच्या पार्श्वभुमीवर भाविकांच्या सोयी सुविधेसाठी जय्यत तयारी केलीय. अनेक धार्मिक कार्यक्रमांचही आयोजन करण्यात आल्याचं साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्याश्री बानायत यांनी (Saibaba death anniversary celebration) सांगीतलं.