अहमदनगर -शिर्डी साईबाबांच्या जन्मभूमी वादावार शुक्रवारी शिर्डी ग्रामस्थ आणि पंचकृषीतील प्रमुखांची बैठक पार पडली. शिर्डी पंचकृषीतील 25 गावांचे प्रतिनीधी या बैठकीला उपस्थित होते. यामध्ये रविवारपासून शिर्डी आणि पंचकृषीतील गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. आज (शनिवारी) 5 वाजता शिर्डी ग्रामस्थ द्वारकामाई मंदिरासमोर ग्रामसभा घेणार असून, आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार आहेत.
शिर्डीसह 25 गावांत रविवारपासून बेमूदत बंद! हेही वाचा - 'हे सरकार सूड उगवणारे नाही'; मुख्यमंत्री ठाकरेंचा भाजपला टोला
शिर्डी बंदचा निर्णय झाल्यामुळे हा वाद तीव्र होताना दिसत आहे. पाथरी हे साईबाबांचे जन्मस्थळ असल्याच्या दाव्याने शिर्डीकरांनी तीव्र नापसंती व्यक्त करत आहेत. राहाता, अस्तगाव, पुणतांबा, डोहळे, एकरूखे, शिंगवे, नांदुर्खी, सावळीविहीर, निघोज निमगाव, वडझरी, पिंपळस, साकुरीसह इतर गावातील पदाधिकारी आणि लोकांनीही बंद पाळण्याचा इशारा दिला आहे.
काही लोक साईबाबा हे साईभक्तांचे श्रध्देचे ठिकाण असल्याने कोणी कितीही राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना त्यात यश येणार नसल्याचा टोला गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी शिर्डीत आल्यानंतर लावला आहे.