अहमदनगर- शिर्डीत सोमवार १५ जुलै ते बुधवार १७ जुलै २०१९ या तीन दिवसाच्या काळात चलणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सवाची साई संस्थानच्या वतीने जय्यत तैयारी करण्यात येत आहे. उत्सवाच्या मुख्य दिवशी १६ जुलै रोजी चंद्रग्रहण असल्यामुळे श्रींच्या शेजारती नंतर समाधी मंदिर बंद राहाणार असून कलाकार हजेरी कार्यक्रम होणार नसल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारीअधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली आहे.
माहिती देताना संस्थानचे मुख्य कार्यकारीअधिकारी दीपक मुगळीकर
गुरु-शिष्य ही परंपराफार प्राचीन आहे. आपल्यागुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्तकरण्यासाठी आषाढीपौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. साईबाबांच्या हयातीतही गुरुपौर्णिमा शिर्डीत मोठ्याउत्साहात साजरी केली जात असे. त्यामुळे या दिवसाला आजही महत्व आहे . साईबाबांवर श्रध्दा असणारे असंख्य भाविक दरवर्षी गुरुपौर्णिमेला शिर्डीला येवून समाधीचे दर्शन घेतात. याही वर्षी गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून उत्सवाच्या पहिल्या दिवशी सोमवार दिनांक १५ जुलै रोजी पहाटे ४.३० वाजता श्रींची काकडआरती, ५.०० वाजता श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, ५.१५ वाजता व्दारकामाई श्री साई सच्चरिताचे अखंड पारायण, ५.२० वाजता श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी६.०० वाजता श्रींची पाद्यपुजा, दुपारी १२.३०वाजता श्रींची माध्यान्हआरती व सायंकाळी ४.००ते ६.०० या वेळेत ह.भ.प.गंगाधरबुवा व्यास, डोंबवली (मुंबई) यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. सायं. ७.०० वाजता श्रींची धुपारती होईल. रात्री ७.३० ते १०.०० यावेळेत अश्विनी जोशी, नाशिक यांचा भजन संध्या कार्यक्रम, रात्री ९.१५ वाजता श्रींच्या पालखीची गावातून मिरवणूक होणार असून पालखी मिरवणूक परत आल्यानंतर रात्री १०.३० वाजता श्रींची शेजारती होईल. या दिवशीपारायाणासाठी व्दारकामाई रात्रभर उघडी राहील.
उत्सवाच्या मुख्य दिवशी मंगळवार दिनांक १६ जुलै रोजी पहाटे ४.३० वाजता श्रींची काकडआरती, ५.०० वाजता अखंड पारायण समाप्ती व श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, ५.२० वाजता श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी ६.०० वाजता श्रींची पाद्यपुजा, दुपारी १२.३० वाजता श्रींची माध्यान्हआरती व सायंकाळी ४.०० ते ६.०० या वेळेत ह.भ.प.गंगाधरबुवा यांचा कीर्तन कार्यक्रम होणार असून सायंकाळी ७.०० वाजता श्रींची धुपारतीहोईल. सायंकाळी ७.३० ते रात्री १०.०० या वेळेत पं. राजा काळे यांचा अभंग कार्यक्रम, रात्री ९.१५ वाजता श्रींच्या रथाची गावातून मिरवणूक निघणारआहे. तसेच या दिवशी चंद्रग्रहण असल्यामुळे रात्री १२.०० वाजता शेजारती नंतर समाधी मंदिर बंद होईल.
उत्सवाची सांगता बुधवार दिनांक १७ जुलै रोजी पहाटे ५.१५ वाजताश्रींची काकड आरती होईल. सकाळी ५.४५ वाजता श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी ७ वाजता श्रींची पाद्यपुजा व गुरुस्थानमंदिरात रुद्राभिषेक होणार असून सकाळी १० वाजता ह.भ.प.गंगाधरबुवा व्यास यांचा गोपालकाला कीर्तन वदहिहंडीचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी १२.१० वाजता श्रींची माध्यान्ह आरती होणार असून सायंकाळी ७ वाजता श्रींची धुपारती होईल. सायंकाळी ७.३० ते रात्री १०.०० या वेळेत मदन चौहान यांचा भजन संध्या कार्यक्रम होईल. रात्री १०.३० वाजता श्रींची शेजारती होईल.
उत्सवाच्या निमित्ताने व्दारकामाई मंदिरात पहिल्या दिवशी होणाऱ्या श्री साईसच्चरिताच्या अखंड पारायणासाठी जे साई भक्त इच्छुक आहेत, त्यांनी आपली नावे दिनांक १४ जुलै २०१९ रोजी दुपारी १.०० ते सायंकाळी ६.०० यावेळेत समाधी मंदिरासमोरील देणगी काऊंटर नंबर ०१ वर नोंदवावीत. सोडत पध्दतीने पारायणासाठी भक्तांची नावे त्याचदिवशी सायंकाळी ६.१० वाजता चिठ्ठ्या काढून निश्चित करण्यात येतील. तसेच दिनांक १४ जुलै रोजी मुख्य दिवशी चंद्रग्रहण असल्यामुळे कलाकारांचा हजेरी कार्यक्रम होणार नाही, याची साईभक्तांनी नोंद घ्यावी, असेही मुगळीकर यांनी सांगितले.