महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'साई संस्थानने 100 बेडच्या बालकोविड सेंटरची उभारणी करावी' - बालकोविड सेंटर

राज्‍यात कोविडच्या येणाऱ्या संभाव्‍य तिस-या लाटेत लहान मुले जास्‍त प्रमाणात बाधित होण्‍याची शक्‍यता आहे. हे लक्षात घेवून करावयाच्‍या उपाययोजनांसाठी साईबाबा संस्‍थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांनी, श्रीरामपुर येथील बालरोगतज्ञ डॉ.कृष्‍णकुमार चोथाणी यांचे मार्गदर्शन पर चर्चासत्र आयोजित करून योग्य कार्य केले आहे.

बालरोगतज्ञ डॉ.कृष्‍णकुमार चोथाणी

By

Published : May 30, 2021, 9:05 AM IST

अहमदनगर -राज्‍यात कोविडच्या संभाव्‍य येणा-या तिस-या लाटेत लहान मुले जास्‍त प्रमाणात बाधित होण्‍याची शक्‍यता आहे. हे लक्षात घेवून करावयाच्‍या उपाययोजनांसाठी साईबाबा संस्‍थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांनी, श्रीरामपुर येथील बालरोगतज्ञ डॉ.कृष्‍णकुमार चोथाणी यांचे मार्गदर्शन पर चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चासत्रा दरम्यान डॉ. चोथाणी यांनी, 'संस्‍थानने तिसर्‍या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन पूर्वतयारी व उपाययोजना करावी', अशी मागणी केली आहे.

तिसर्‍या लाटेत बालकांना संसर्गाचा संभाव्य

बालकांना तिसर्‍या लाटेत संसर्गाचा संभाव्य धोका आहे. हे विचारात घेऊन साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली साईबाबा संस्थान प्रशासनाकडून योग्य उपाययोजना सुरू आहेत. बालकांच्या बाबतीत भविष्यात धोका नको, म्हणून बालरोगतज्ञ डॉ. कृष्‍णकुमार चोथानी यांचे आरोग्य विषयक चर्चासत्र बोलावण्यात आले होते. बालकांना संसर्ग झाल्यास त्यांची घ्यावयाची विशेष काळजी व करावयाचे औषधोपचार, याबाबत डाॅ.कृष्‍णकुमार चोथाणी यांनी मार्गदर्शन केले.

बालकोविड कक्षाचा प्रमुख

बालकोविड कक्षाचे प्रमुख म्हणून डाॅ. चोथाणी यांच्याकडे कार्यभार सोपवावा. ते निस्वार्थ व निरपेक्ष भावनेने सेवा देतील असा विश्वास साईनिर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजय कोते यांनी व्यक्त केला.

तिसऱ्या लाटेपूर्वी आपण अलर्ट होणे गरजेचे

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना आपण पुरेसे सज्ज नसल्याने रुग्ण व नातेवाईकांची मोठी धावपळ झाली. काहींना प्राणही गमवावे लागले. तिसऱ्या लाटेच्या सामन्यापूर्वी आपण अलर्ट होणे गरजेचे आहे. लहान मुलांना या लाटेत संसर्गाचा जास्त धोका होणार असल्याचे तज्ञांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बगाटे यांना बालकांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर उभारावे अशी विनंती केली होती, तसेच या सेंटरमध्ये आपण वैद्यकीयसेवा द्यावी अशी विनंती बालरोगतज्ञ डॉ. चोथानी यांना केली होती. दोघांनीही माझ्या विनंतीला मान देऊन यासाठी पावले उचलली असल्याचे कोते म्हणाले आहे.

हेही वाचा- अभिनेत्रीचा लस घेण्यासाठी कारनामा; फ्रंटलाईन वर्करचे खोटे ओळखपत्र बनवून घेतला डोस

ABOUT THE AUTHOR

...view details