शिर्डी (अहमदनगर) -साईबाबांच्या शिर्डी नगरीत रिलायन्स उद्योग समुहाच्या माध्यमातून सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून हवेतून ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणारी 1200 एल.पी.एम.क्षमता असलेली प्रणाली (पीएसए) बसविण्याचे काम अखेर पूर्ण झाले आहे. मंगळवारी (दि. 18 मे) दुपारी 12.30 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शुभारंभ करण्यात आला आहे.
साई संस्थानच्या ऑक्सिजन प्लांटचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'व्हिडिओ कॉन्फरन्सिंग'द्वारे शुभारंभ - Saibaba news
साईबाबांच्या शिर्डी नगरीत रिलायन्स उद्योग समुहाच्या माध्यमातून सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून हवेतून ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणारी 1200 एल.पी.एम.क्षमता असलेली प्रणाली (पीएसए) बसविण्याचे काम अखेर पूर्ण झाले असून मुख्यमंत्र्यांना आज त्याचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शुभारंंभ केला.
साईबाबा संस्थानच्या साईनाथ रुग्णालय शेजारच्या हवेने ऑक्सिजनची निर्मिती करणारा हा प्लान्ट कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी जीवदान ठरणार असून या ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते पार पडला आहे. या कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्ह्यातील खासदार तसेच सर्व आमदार उपस्थित होते. कोरोनाच्या दुसर्या लाटेत जिल्ह्यातील रुग्णालयांना ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासत असल्याने कोरोनाग्रस्त रुग्णांना समस्यांचा सामना सहन करावा लागला. देशविदेशात नावलौकिक मिळवलेल्या श्री साईबाबा संस्थानच्या साईबाबा आणी साईनाथ रुग्णालयात कोरोनाग्रस्तांना रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्याने साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी रिलायन्स समुहाशी संपर्क साधून हवेतून ऑक्सिजन निर्माण होणार्या प्लांटबाबत चर्चा केली आणि त्यांनी तातडीने होकार दर्शवित सुमारे दोन कोटी रुपये खर्च असलेल्या 1200 एल.पी.एम. क्षमतेच्या पी.एस.ए.प्रोजेक्टसाठी पुढाकार घेतला होता. साईबाबा विश्वस्त व्यवस्थेच्या साईनाथ रुग्णालयाशेजारच्या जागेवर महिनाभरात कामकाज सुरू करून अखेरीस पूर्ण झाले. साईबाबा संस्थानच्या साईनाथ रुग्णालयाच्या सुमारे अडीचशे बेडला चोवीस तास पुरेल इतका ऑक्सिजनचा साठा उपलब्ध होणार आहे. हवेने ऑक्सिजन तयार करणारा हा प्लान्ट कोविड रुग्णांसाठी वरदान ठरेल.
हेही वाचा -ऐंशी वर्षांच्या कोरोनाग्रस्त आजी-आजोबांचा झिंगाट डान्स!