शिर्डी (अहमदनगर)- सुप्रसिद्ध अभिनेता ऋषी कपूर यांचे आज निधन झाल्याचे शिर्डीकारांच्या कानावर पडताच कपुरांच्या शिर्डी भेटींची आठवण काढत एका सच्च्या साईभक्ताला गमवल्याचं दुः ख व्यक्त केल जात आहे.
अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाबद्दल शिर्डीकरांनी व्यक्त केले दु: ख - साई संस्थानचे माजी विशवस्थ सचिन तांबे
आज अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन झाले आहे. ते साई भक्त होते. त्यांच्या निधनाने समस्त शिर्डीकरांनी दुःख व्यक्त केल्याचे साई संस्थानचे माजी विशवस्थ सचिन तांबे यांनी सांगितले.
अमर अकबर अँथोनी या चित्रपटात ऋषी कपूर यांनी तारीफ तेरी निकली है दिल से आई है लब पे बनके कव्वाली, शिर्डीवाले साईबाबा ही कवाली चित्रीत केली होती. ही कव्वाली चांगलीच गाजली होती. या नतंर यांनी शिर्डीकरांच्या आणि साईभक्तांच्या मनात एक वेगळी जाग निर्माण केली होती. ऋषी कपूर लहानपणापासून साईबाबांचा भक्त असल्याच नेहमी शिर्डीकरांना सांगत. लहान असताना साईबाबांच्या समाधी चौथऱ्यावर चढून पुजा करण्याचा योग आणि ती संधी अनेकदा मिळाली होती, असेही ऋषी कपूर शिर्डी भेटीत सांगत होते. असे ऋषी कपूर न चुकता वर्षाकाठी शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला येत असत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ते आजारी असल्याने येऊ शकले नव्हते. आज त्यांचे निधन झाल्याचे कळाल्याने शिर्डीकर हळहळ व्यक्त करत आहेत. ऋषी कपूर यांच्या निधनाबद्दल साई संस्थानचे माजी विशवस्थ सचिन तांबे यांनी दु: ख व्यक्त केले आहे.
हेही वाचा -लॉकडाऊनमध्ये साई मंदिराला कोट्यवधींचे दान, भक्तांनी दर्शन आणि दानासाठी निवडला 'हा' पर्याय