अहमदनगर- कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी 17 मार्च रोजी देशातील मंदिराची दारे बंद करण्यात आलीत असे असले तरी भाविकांच्या श्रद्धेची दारे बंद होऊ शकले नाहीत. साई मंदिर संस्थानला या काळात ऑनलाईन पद्धतीद्वारे 1 कोटी 90 लाख 70 हजार 754 रुपये दान मिळाले आहे. साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असूनही लॉकडाऊनच्या काळात साई संस्थानच्या वेबसाईट आणि मोबाईल अँपच्या माध्यमातून पाच लाखांच्या वर भाविकांनी दर्शन घेतले आहे.
लॉकडाऊनमध्ये साई मंदिराला कोट्यवधींचे दान, भक्तांनी दर्शन आणि दानासाठी निवडला 'हा' पर्याय - sai temple
लॉकडाऊन असले तरी साई संस्थानला मिळणाऱ्या दानात मात्र कुठेही कमी आलेली दिसुन येत नाही. मागील वर्षी 18 मार्च ते 25 एप्रिल या काळात साई संस्थाला 1 कोटी 76 लाख 76 हजार 942 रुपयांचे दान मिळाले होते. तर या वर्षी लॉकडाऊन असताना याच काळात तब्बल 1 कोटी 90 लाख 70 हजार 754 रुपये दान मिळाले आहे.

साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असूनही रोज साईबाबा संस्थानच्या अधिकृत वेबसाईटवर सरासरी नऊ हजार भाविक दर्शन घेतात तर एक लाख बारा हजारांच्या वर मोबाईल धारकांनी साई संस्थानचे अॅप डाऊनलोड केलेले आहे. त्यातील तीस हजार लोक दररोज साईंचे ऑनलाईन दर्शन घेत असतात.साई मंदीर भक्तांच्या दर्शनासाठी बंद आहे. मात्र, दररोज सकाळी साडेचार ते रात्री अकरा पर्यंत मंदिरात नित्य नेमाने होणाऱ्या साईबाबांच्या चार आरती कायम सुरु असतात.कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी 17 मार्च रोजी साईमंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले.मोबाईल अॅपद्वारे दर्शन घेणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे.