शिर्डी- कोरोना व्हायरसचा पादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन करण्यात आला आहे. यावेळी साईबाबांच्या शिर्डीत कोणीही उपासी राहु नये यासाठी शिर्डीतील साई कर्नाटक भवन स्त्रम येथील साईभक्त तब्बल दररोज चारशे लोकांना भोजन देत आहेत.
शिर्डीतील साई कर्नाटक भवन, दत्त प्रतिष्ठान देतायेत रोज ४०० लोकांना भोजन... शिर्डी हे भाविकांचा ओघ आणि हजारो लोकांचे उद्धारनिर्वाह करण्याचे ठिकाण आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून साईबाबांच्या शिर्डीत हजारो लोक आपला उद्धारनिर्वाह करण्यासाठी आले आहेत. मात्र, आता कोरोना व्हायरसचा पादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन करण्यात आल्याने या लोकांवर उपासी राहण्याची वेळ येऊ नाही म्हणून शिर्डीतील अनेक सामाजिक, राजकीय संघटना पुढे आल्या आहेत. या लोकांना होईल तितकी मद्दत त्या करत आहेत. आता मात्र थेट शिर्डीतील साई कर्नाटक भवन स्त्रम आणि दत्त प्रतिष्ठान पुढे आले असून गोरगरीब लोकांना दुपारी मसाले भात तर संध्याकाळी सांबर भाताचे भोजन म्हणून तब्बल 400 लोकांना देत आहेत.साईबाबांच्या मंदिरापासून काही अंतरावर असलेला दत्तनगर येथील साई कर्नाटक भवन स्त्रम आणि दत्त प्रतिष्ठान मिळून दररोज दुपारी आणि संध्याकाळी गोरगरीब लोकांना मोफत अन्नदान करत आहे. भोजन करण्याचा वेळ झाला की लोकांना सोशल डिस्टन्स ठेवून रांगेत उभे केले जाते आणि प्रत्येकाच्या घरात किती व्यक्ती आहेत त्यानुसार त्यांना कुपन दिले जाते. त्यामुळे या गोरगरिबांना मद्दत करण्याचे आवाहन यावेळी केले आहेत.