शिर्डी (अहमदनगर): श्रावण महिना सुरू झाला की, सर्वत्र धार्मिक कार्यक्रमांची सुरुवात होते. तर गेल्या सात दिवसापासून शिर्डीत सुरू असलेल्या साई चरित्र पारायणाची आज अवतरणिका पठण करत सांगता झाली. श्रावण मासातील सामूहिक साईचरित्र पारायणाचे यंदाचे 29 वे वर्ष असून जवळपास सात हजार पारायणार्थींनी यात सहभाग घेतला.
मोठ्या प्रमाणात शिधा जमा :आज समाप्तीच्या दिवशी साई संस्थान शिधा जमा करते. यात चक्क एक लाखापेक्षा अधिक चपाती आणि दोन पातेले शेंगदाना चटणी जमा झाली आहे. दरवर्षी प्रमाणे यंदा ही पारायणार्थींना शिजवलेला शिधा घेवून येण्याचे आवाहन साई संस्थानच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी महिलांनी मोठ्या प्रमाणात चपाती, शेंगदाणा चटणी अणि लोणचे असे अन्न शिधा स्वरुपात जमा केले. पारायण समाप्तीनंतर याच अन्नाची पंगत बसवून ते प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले.
29 वर्षापासून साईचरित्राचे पारायण : शिर्डीमध्ये हेमाडपत लिखित साईचरित्राचे पारायण साईबाबा संस्थान व नाट्य रसिक संच यांच्यावतीने गेल्या 29 वर्षापासून सुरू आहे. श्रावण महिना सुरू झाल्यानंतर सात दिवस हा पारायण सोहळा चालतो. यात एकून त्रेपन्न अध्याय असून साईबाबाच्या आरतीने यास दररोज सकाळी सुरुवात होते. चरित्राचे पारायण केल्याने घरात सुख, शांती येते, तसेच मनोबल वाढते, असे सांगण्यात येते. सुरुवातीला पंधरा वर्षापूर्वी यात फक्त साठ भक्तांनी भाग घेतला. परंतु यात दिवसेंदिवस वाढ होऊन आज सात हजार संख्या झाली आहे. दरवर्षीपेक्षा यंदा या सोहळ्यात महिलांची सख्या जास्त असून, पारायणासाठी काही महिला माहेरी आल्या आहेत. तर कोणी आपली लहान मुले घरी ठेऊन आल्या आहेत.
पारायण केल्याने मन प्रसन्न होते : 'सबका मालिक एक' चा संदेश व श्रद्धा आणि सबुरीचा महामंत्र सपूर्ण जगाला देणारे साईबाबांच्या चरित्राचे पारायण केल्याने, मन अगदी प्रसन्न होते. श्रावण महिन्यात चालणाऱ्या या महासोहळ्यास अनेक दानशूर भरभरून देणगीही देतात.
हेही वाचा -
- चंद्रयान 3 मोहीमेत भारताला यश; साईबाबा संस्थानकडून इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन
- Shirdi Sai Baba : दोन हजार रुपये नोटबंदीनंतर साई संस्थान अलर्ट; भाविकांना केले 'हे' आवाहन
- Shirdi Sai Trust : भाविकांशी गैरवर्तन केल्यास कर्मचाऱ्यांची गय नाही - शिर्डी साई संस्थानचे सीईओ राहुल जाधव