महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

31 डिसेंबरला शिर्डीचे साईमंदिर रात्रभर खुले

नव वर्षाच्या पूर्व संध्येला म्हणजेच ३१ डिसेंबरला शिर्डीचे साईबाबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी रात्र भर खुले ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. तसेच गेल्या १४ दिवसात जवळपास अडीच लाख भाविकांनी साईंचे दर्शन घेतले आहे. तर सुमारे सव्वा तीन कोटीचे दान साई चरणी अर्पण केले आहे.

sai temple
साई भक्तासांठी 31 डिसेंबरला मंदिर राहणार रात्रभर खुले

By

Published : Dec 30, 2020, 1:11 PM IST

Updated : Dec 30, 2020, 1:46 PM IST

शिर्डी- कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊन काळात तब्बल 8 महिन्यांहून अधिक काळ साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद होते. त्यानंतर अनलॉक महाराष्ट्रात साईंच्या मंदिराची दारेही नियमांच्या बंधनात भक्ताना दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत. त्यानतंर लाखो भाविकांनी साईंचे दर्शन घेतले आहे. दरम्यान कोरोना महामारीने ग्रासलेले हे वर्ष दोन दिवसातच समाप्त होणार आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव वर्षाचे स्वागत करताना अनेक भाविक साईंच्या मंदिरात दर्शानासाठी हजेरी लावतात. त्यामुळे जास्तीत जास्त भाविकांना साईंचे दर्शन घेता यावे, यासाठी 31 डिसेंबरला साईंचे मंदिर भाविकांसाठी रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.

या काळात मंदिर राहणार बंद-

रात्री बाराच्या ठोक्याला साई मंदिरात उपस्थित राहण्यासाठी अनेक जण मंदिरात गर्दी करतात. मात्र या वर्षी मंदिर स्वच्छतेसाठी रात्री 11.25 ते 11.55 पर्यंत भक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे १२ च्या सुमारास होणारी गर्दी देखील टाळण्यासाठी मंदिर समितीकडून नियोजन करण्यात आले आहे. 31 डिसेंबरला रात्रभर मंदिर उघडे राहणार असल्याने 31 ची शेज आरती आणि 1 जानेवारीची काकड आरती रद्द करण्यात आली आहे.

चौदा दिवसात कोट्यवधीचे दान-

शिर्डी साई दरबारी भाविकांचा ओघ कायम आहे. गेल्या चौदा दिवसात जवळपास अडीच लाख भाविकांनी साईंचे दर्शन घेतले. तसेच साईंच्या दान पेटीत भाविकांकडून दानही भरभरून दिले जात आहे. साईंना जवळपास सव्वा तीन कोटी रुपयांची दक्षिणा अर्पण केला असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी ई टीव्ही भारतला दिली.

गेल्या चौदा दिवसात तीन कोटींचे दान

सोन्या चांदिचे दान-

15 डिसेंबर ते 29 डिसेंबर पर्यंतच्या दक्षिणा पेट्या मंगळवारी उघडण्यात आल्या. या रकमांची मोजदाद आज दिवसभर सुरू होती. दक्षिणा पेटीत 3 कोटी 16 लाख 83 हजार 980 रुपये रोख स्वरूपात मिळाले. यात 3 कोटी ११ लाख 44 हजार 831 रुपयांच्या नोटा तर 5 लाख 39 हजार 149 रुपयांच्या नाण्यांचा समावेश होता. याशिवाय 4 लाख 12 हजार रुपयांचे 93 ग्रॅम सोने व 1 लाख 99 हजार रुपयांची 3808 ग्रॅम चांदी सुद्धा भाविकांनी बाबांना अर्पण केली आहे. तसेच जवळपास साडेआठ हजार रुपयांचे विदेशी चलनही दक्षिणा पेटीत मिळून आल्याची माहिती कान्हुराज बगाटे यांनी दिली.

गेल्या चौदा दिवसात तीन कोटींचे दान

यावेळी डेप्युटी सीईओ रविंद्र ठाकरे, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे उपस्थीत होते. संस्थानने कोरोना काळात भाविकांच्या दर्शनासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. कोवीडचे नियम पाळत जवळपास अडीच लाख भाविकांनी चौदा दिवसात साईदर्शनाचा लाभ घेतला.

Last Updated : Dec 30, 2020, 1:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details