शिर्डी (अहमदनगर) -देशातील व राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने 4 एप्रिल 2021 च्या कोविड-19 संदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार आज ( 5 एप्रिल 2021) रोजी रात्री 8 वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत साईबाबा समाधी मंदिर दर्शनाकरीता बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच याकाळात मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम नेहमीप्रमाणे सुरु राहतील, अशी माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली आहे.
आजपासून शिर्डीचे साईबाबा समाधी मंदिर भाविकांसाठी राहणार बंद - शिर्डीचे साईबाबा मंदिर
राज्यात कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता राज्य सरकारने कडक निर्बंध घातले आहेत. त्यानंतर आज ( 5 एप्रिल 2021) रोजी रात्री 8 वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत साईबाबा समाधी मंदिर दर्शनाकरीता बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच याकाळात मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम नेहमीप्रमाणे सुरु राहतील, अशी माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली आहे.
ऑनलाईन बुकींग व प्रसादालयही राहणार बंद -
याच पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थानच्या वतीने दिनांक 5 एप्रिल 2021 रोजी रात्री 8 वाजल्यापासून साईबाबा समाधी मंदिर दर्शनाकरीता साईभक्तांना बंद ठेण्यात येणार आहे. या दरम्यान समाधी मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम सुरु राहतील यामध्ये कुठलाही खंड पडणार नाही. याबरोबरच संस्थानचे श्री साईप्रसादालय व भक्त निवासस्थानेही बंद ठेवण्यात येणार आहेत. संकेतस्थळावरुन ऑनलाईन दर्शन बुकींग बंद करण्यात आलेले आहे. याबाबतची माहिती साईभक्तांना ई-मेल, दुरुध्वनी व संकेतस्थळावरुन देण्यात येत आहे. हे सर्व नियम शासनाचे पुढील आदेशापर्यंत सुरु राहणार आहेत. तरी साईभक्तांनी यांची नोंद घेवून सहकार्य करावे,असे आवाहन रविंद्र ठाकरे यांनी केले आहे. याशिवाय साईसंस्थानची भक्तनिवास व्यवस्थाही या काळात बंद असेल. प्रसादालय व कॅन्टीन सुद्धा बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रसादालयात केवळ रूग्णालय व कोविड सेंटरच्या रूग्णांसाठीच जेवण बनवले जाणार असल्याचेही ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.