महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिर्डी ग्रामस्थांची सद्भावना रॅली..'सबका मालिक एक'चा संदेश - शिर्डी साईबाबा

पाथरी येथे साईबाबांचे मुळ जन्मस्थळ असल्याच्या दावा करण्यात आल्यानंतर आजपासून शिर्डी बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला शिर्डीसह पंक्रोषीतून उस्फुर्त प्रतिसादही मिळत आहे. त्यातच आता शिर्डीवासीयांनी द्वारकामाईतून सदभावना रॅली काढली आहे.

शिर्डी ग्रामस्थांनी सद्भावना रॅलीतून दिला 'सबका मालिक एक'चा संदेश....
शिर्डी ग्रामस्थांनी सद्भावना रॅलीतून दिला 'सबका मालिक एक'चा संदेश....

By

Published : Jan 19, 2020, 12:30 PM IST

Updated : Jan 19, 2020, 12:35 PM IST

शिर्डी- साई बाबांच्या जन्मभूमीचा वाद आता चांगलाच चर्चेला येऊ लागला आहे. पाथरी येथे साईबाबांचे मूळ जन्मस्थळ असल्याचा दावा करण्यात आल्यानंतर आजपासून शिर्डी बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला शिर्डीसह पंचक्रोषीतून उत्स्फुर्त प्रतिसादही मिळत आहे. त्यातच आता शिर्डीवासीयांनी द्वारकामाईतून सदभावना रॅली काढत सबका मालिक एक असल्याचा संदेश दिला आहे.

पाथरी येथील साईबाबांच्या जन्मस्थळावरून वाद सुरू झाला आहे. शिर्डीकरांनी त्याला विरोध करत शिर्डी हेच साईंचे जन्मस्थळ असल्याचा दावा केला आहे. तसेच या वादाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीबंदची हाक देण्यात आली होती. त्यानंतर आज शिर्डी माझे पंढरपूर या आरतीने सदभावना रॅली काढण्यात आली. शहरातून मार्गस्थ होणाऱ्या या रॅलीत साईंच्या प्रतिमेसह शिर्डी हेच साईंचे जन्मस्थळ असल्याचे फलकही झळकवले जात आहेत.

साईचरीत्रातील ओव्यांचे फलकही घेवुन पालखी मार्गा वरुन ही सदभावना रॅलीने शहरातून परिक्रमा केली.

Last Updated : Jan 19, 2020, 12:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details