शिर्डी (अहमदनगर) -राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. यामुळे शिर्डीच्या साई मंदिरातील दर्शन वेळेत बदल करण्यात आले असून रात्रीच्या शेज आरतीला आणि पहाटेच्या काकड आरती वेळी भक्तांना प्रवेश न देण्याचा निर्णय साई संस्थान प्रशासनाने घेतला आहे.
सकाळी सहा ते रात्री नऊपर्यंतच दर्शन पास देण्यात येईल
माहिती देताना कान्हूराज बगाटे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. यामुळे साई संस्थानच्या वतीने आगाऊ बुकिंग करुनच साईच्या दर्शनाला यावे, असे आवाहन भक्तांना करण्यात आले आहे. त्याचबरोबर दर्शनासाठी आल्यानंतर कोरोनाबाबतचे सर्व नियमांचे पालक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रात्रीच्या संचारबंदीच्या नियमांचे पालन होऊ नये यासाठी रात्री लवकरच मंदिर भक्तांसाठी बंद करण्यात येणार असून पहाटेची काकड आरती व रात्रीची शेज आरती भक्तांविना मंदिरातच करण्यात येईल. तसेच दर्शन पासेस सकाळी सहा ते रात्री नऊ वाजेदरम्यान दिले जाणार असल्याचे मंदिर समितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर भक्तांची गर्दी लक्षात घेता गुरुवार, शनिवार, रविवार तसेच सुटीच्या दिवशी मोफत बायोमेट्रीक पोसेस दिले जाणार नाहीत. मात्र, ऑनलाइन पास असणाऱ्या भक्ताला साईंचे दर्शन घेता येईल.
हेही वाचा -पंतप्रधान स्वनिधी योजनेत जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर मात्र अधिक कर्जाची लाभार्थ्यांची अपेक्षा