अहमदनगर- कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांच्याकडून दलित समाजातील पीडितांना न्याय मिळत नाही. त्यामुळे त्यांची तातडीने इतरत्र बदली करावी, या मागणीसाठी आरपीआय आठवले गटाच्यावतीने कर्जत तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
पोलीस निरीक्षकाविरोधात कर्जत तहसीलवर आरपीआयचा मोर्चा; तहसीलदारांनी दिले निवेदन - पोलीस
कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांच्याविरूद्ध आरपीआय आठवले गटाच्यावतीने कर्जत तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या नेतृत्वाखाली हलगी वाजवत कर्जत शहरात मोर्चा काढून तहसील कार्यालयावर आणण्यात आला. यावेळी बोलताना साळवे म्हणाले, कर्जत तालुक्यात अनेक प्रकरणात कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक चव्हाण हे दलित समाजाविरोधात भूमिका घेतात. अनेक पीडितांना न्याय न देता त्यांनाच आरोपी केले जाते. याचा निषेध म्हणून आरपीआयच्यावतीने तहसील कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्यावर कारवाई न झाल्यास कर्जत बंद करू असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी अनेक तक्रारदारांकडून आपले अर्ज तहसीलदारांना एकत्रितपणे देण्यात आले.