महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माळरानावर दरवळतोय गुलाबाचा सुगंध ! खंदरमाळ येथील शेतकरी रवींद्र लेंडें यांची यशोगाथा.... - गुलाब बाग शेती संगमनेर विशेष बातमी

संगमनेर तालुक्यातील पठारभाग म्हटला की चटकन डोळ्यासमोर दुष्काळ येतो. ( Drought in Sangamner ) तरीदेखील येथील शेतकरी विविध समस्यांवर मात करुन यशस्वी शेती करत आहे. ( Farmers in Sangamner ) खंदरमाळ येथील प्रयोगशील शेतकरी रवींद्र लेंडे यांनी खडकाळ माळरानावर गुलाबाची बाग फुलवली आहे. ( Rose Farming on Hilly Land )

rose farm
गुलाब बाग

By

Published : Feb 20, 2022, 1:37 PM IST

अहमदनगर - संगमनेर तालुक्यातील पठारभाग म्हटला की चटकन डोळ्यासमोर दुष्काळ येतो. ( Drought in Sangamner ) तरीदेखील येथील शेतकरी विविध समस्यांवर मात करुन यशस्वी शेती करत आहे. ( Farmers in Sangamner ) खंदरमाळ येथील प्रयोगशील शेतकरी रवींद्र लेंडे यांनी खडकाळ माळरानावर गुलाबाची बाग फुलवली आहे. ( Rose Farming on Hilly Land ) त्यामुळे गुलाबाचा सुगंध दरवळत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

शेतकरी रवींद्र लेंडे यांची प्रतिक्रिया

एक एकरमध्ये पॉलिहाऊस -

प्रयोगशील शेतकरी रवींद्र लेंडे यांना पहिल्यापासूनच शेतीची प्रचंड आवड असल्याने ते पॉलिहाऊस व शेडनेटमध्ये ढोबळी मिरची, काकडी अशी पिके घेतात. त्यातच हा संपूर्ण परिसर खडकाळ माळरानावर वसलेला आहे. त्यामुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. मात्र, अशा कठीण परिस्थितीतही लेंडे यांनी एक एकरमध्ये पॉलिहाऊसची उभारणी केली आहे. त्यामध्ये त्यांनी गुलाबाची लागवड केलेली आहे. मात्र, पाण्याची कमतरता असल्याने त्यांनी पॉलिहाऊसवरुन वाहून जाणारे पावसाचे पाणी अडवून पाईपद्वारे शेततळ्यात सोडून दिले आहे.

चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा -

या प्रयोगामुळे पाण्याची समस्या सुटली असून, आज त्यांची गुलाबाची शेती बहरली आहे. विशेष म्हणजे पाण्याची बचत व्हावी म्हणून त्यांनी गादी वाफे तयार करत त्यामध्ये नारळ्याच्या शेंड्यांचा भुस्सा टाकला आहे. त्यावर गुलाबाची लागवड केली आहे. यामुळे गुलाबाची झाडेही टवटवीत राहत आहे. सध्या फुलांची काढणी सुरू असून 20 फुलांचा गुच्छ व्यवस्थितरित्या बांधून व्यापार्‍यांना पाठवत आहे. यातून चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा -Godavari River Cleanliness : पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गोदावरीची दुर्दशा, प्रदूषित पाणी थेट नदीत

बाग पाहण्यासाठी शेतकऱ्यांची भेट -

गुलाबाच्या फुलांची अतिशय काळजी घ्यावी लागते. तेव्हाच फुले टवटवीत राहतात. अनेक शेतकरी ही बाग पाहण्यास आवर्जुन भेट देत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details