अहमदनगर - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे रोहीत पवार यांनी गुरुवारी कर्जत-जामखेड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी रोहित पवार यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी रोहित यांचे सर्व कुटुंबीय त्यांच्या पाठीमागे उभे असल्याचे पाहायला मिळाले. कर्जत-जामखेडमधून रोहित पवार विजयी होणारच असा विश्वास रोहित यांच्या आई सुनंदा पवार यांच्यासह पत्नीने व्यक्त केला.
रोहित पवार विजयी होणारच! आईसह पत्नीने व्यक्त केला विश्वास - sunanda pawar
कर्जत-जामखेडमधून रोहित पवार विजयी होणारच असा विश्वास राहीत यांच्या आई सुनंदा पवार यांच्यासह पत्नीने व्यक्त केला.
सुनंदा पवार, रोहित पवार आणि कुंती पवार
रोहित यांच्या आई सुनंदा पवार यांनी मागील वर्षीपासूनच कर्जत-जामखेड मतदारसंघात विविध सामाजिक कामाच्या निमित्ताने संपर्क वाढवलेला आहे. रोहित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सुनंदा पवार आणि रोहित यांच्या पत्नी कुंती यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. गेल्या दीड-दोन वर्षांत दिवस-रात्र काम केल्याने रोहित यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला.