महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नगरमध्ये हातकणंगले पॅटर्न : राम शिंदेंनी रोहित पवार यांना बांधला 'विजयी' फेटा - rohit pawar visited ram shindes house in jamkhed

कर्जत जामखेड मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर रोहित पवार यांनी विरोधी उमेदवार राम शिंदे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी राम शिंदे यांच्या मातोश्रींचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. यानंतर राम शिंदे यांनी रोहित पवार यांना फेटा बांधला.

रोहित पवारांनी घेतले राम शिंदे यांच्या मातोश्रींचे दर्शन; राम शिंदेंनी रोहित यांना बांधला फेटा

By

Published : Oct 24, 2019, 11:46 PM IST

Updated : Oct 25, 2019, 11:17 AM IST

अहमदनगर -कर्जत जामखेड मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर रोहित पवार यांनी विरोधी उमेदवार राम शिंदे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी राम शिंदे यांच्या मातोश्रींचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. यानंतर राम शिंदे यांनी रोहित पवार यांना फेटा बांधला. यापूर्वी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभीमानीचे राजू शेट्टी यांनी सेनेच्या धर्यशील माने यांना विजयी फेटा बांधला होता.

रोहित पवारांनी घेतले राम शिंदे यांच्या मातोश्रींचे दर्शन; राम शिंदेंनी रोहित यांना बांधला फेटा

कर्जत-जामखेड मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला. या विजयाचा जल्लोष साजरा केल्या नंतर रोहित यांनी थेट जामखेड तालुक्यातील चौंडी या गावी जाऊन राम शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

राम शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत रोहित पवार यांनी राजकारणात कोणी कुणाचा शत्रू नसतो हा संदेश दिला. पराभव झालेला असूनही मनाचा मोठेपणा दाखवत रोहित पवार यांच्यासोबत आपल्या घराच्या दरवाजापर्यंत येत राम शिंदेंनी त्यांना निरोप दिला.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विजय झाल्यानंतर शिवसेना उमेदवार धैर्यशील माने यांनी देखील अशाच पद्धतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी जाऊन शेट्टी यांच्या मातोश्रींचे दर्शन घेतले.

Last Updated : Oct 25, 2019, 11:17 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details