महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...आणि रोहित पवारांनी मंचावरूनच लावला नरेंद्र मोदींना फोन

संगमनेरच्या अमृतवाहिनी महाविद्यालयात 'संवाद तरुणाईशी' या कार्यक्रमात राज्यातील नवनिर्वाचित युवा आमदारांनी संवाद साधला. या कार्यक्रमावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अवधूत गुप्ते यांनी दिलेल्या एका टास्कवर रोहित पवार यांनी मंचावरून थेट नरेंद्र मोदी यांनाच फोन लावला.

ahamadnagar
अवधूत गुप्तेंच्या गुगलीवर रोहित पवारांची टोलेबाजी

By

Published : Jan 17, 2020, 6:50 PM IST

Updated : Jan 17, 2020, 7:41 PM IST

अहमदनगर - संगमनेरच्या अमृतवाहिनी महाविद्यालयात 'संवाद तरुणाईशी' या कार्यक्रमात राज्यातील नवनिर्वाचित युवा आमदारांनी संवाद साधला. या कार्यक्रमावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अवधूत गुप्ते यांनी दिलेल्या एका टास्कवर रोहित पवार यांनी मंचावरून थेट नरेंद्र मोदी यांनाच फोन लावला. या कार्यक्रमात गुप्ते यांनी रोहित यांना हडपसरचे जावई असूनही निवडणुकीसाठी कर्जत जामखेड मतदारसंघाचीच निवड का केली? असा प्रश्न विचारला. याला उत्तर देताना रोहित यांनी ज्यांचं लग्न झालं आहे, त्यांना कळेल सासुरवाडीचं गणित जमवणं किती अवघड असतं.’ असे म्हणताच एकच हशा पिकला.

अवधूत गुप्तेंच्या गुगलीवर रोहित पवारांची टोलेबाजी

हेही वाचा -'पटानी’च्या प्रश्नावर आदित्य अवधूतला म्हणाले, तुमची 'दिशा' चुकली...

महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांसह सहा तरुण आमदारांची अवधूत गुप्ते यांनी संवाद साधला. अमृतवाहिनी महाविद्यालयातील युवा सांस्कृतिक महोत्सवात ‘संवाद तरुणाईशी’ या कार्यक्रमात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, आमदार रोहित पवार, धीरज देशमुख, ऋतुराज पाटील, झिशान सिद्दिकी यांना गुप्तेंनी बोलते केले. या मुलाखती दरम्यान रोहित म्हणाले, की अनेक जणांना वाटायचं, की पवारसाहेब रिटायर होतील, मात्र कोणत्याही संकटापुढे झुकायचं नाही, हे शरद पवारांनी आम्हाला शिकवले आहे.

हेही वाचा -युवा आमदारांशी संवाद: 'महाराष्ट्राला गरज असताना सगळी नाती एकत्र'

तुमचं संगमनेरवर प्रेम आहे, की प्रवरानगरवर? अशी गुगली अवधूत गुप्ते यांनी रोहित पवारांना टाकली. त्यावर अहमदनगर जिल्ह्यातील एका मतदारसंघाचा मी आमदार आहे. त्यामुळे माझे नगर जिल्ह्यासह राज्यावर प्रेम आहे, असे सावध उत्तर पवारांनी दिले. जेव्हापासून मी पत्रकारांशी बोलायला लागलो तेव्हापासून अशी उत्तरे द्यायला लागल्याचे रोहित म्हणाले. हडपसरचे जावई असूनही तो मतदारसंघ न निवडता कर्जत जामखेडमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला, असा प्रश्न रोहित यांना विचारण्यात आला. ‘हडपसर मतदारसंघ सोपा होता हे तुम्ही मान्य केलं, पण कर्जत जामखेडचा गेल्या तीस वर्षांपासून विकास झाला नव्हता. ज्यांचं लग्न झालं आहे, त्यांना कळेल सासुरवाडीचं गणित जमवणं किती अवघड असतं.’ असं रोहित पवार म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.कर्जत जामखेडच्या लोकांमध्ये साखरेचे दोन चार खडे जास्त आहेत. माझ्या आयुष्यात घराणेशाहीचा विषयच काढणार नाही. त्यामुळे मी कर्जत जामखेड निवडलं, असंही रोहित पवार म्हणाले.

...आणि रोहित पवारांनी मंचावरूनच लावला नरेंद्र मोदींना फोन

या कार्यक्रमादरम्यान, अवधूत गुप्तेंनी सर्व आमदारांना टास्क दिला होता. यात त्यांनी मंचावरूनच एखाद्या व्यक्तीला फोन लावून बोलतोय असे भासवायचे असा हा टास्क होता. यावेळी रोहित पवारांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच फोन लावला. यावेळी ते म्हणाले, नमस्ते मोदी साहेब, रोहित पवार बोलतोय. नाव आपण ऐकलं असेल. साहेब काही नाही, थोरात साहेबांनी संगमनेरमध्ये कार्यक्रम ठेवला होता. त्याठिकाणी आलो होतो. अनेक युवक-युवती आले आहेत. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. त्यामुळे गेली पाच वर्ष जो विकास झाला नव्हता तो आता होईल.”

रोहित पवार पुढे मोदींना म्हणाले की, “आमच्या युवक-युवतींना उद्याच्या काळात चांगली नोकरी मिळावी यासाठी जे इंडस्ट्रियल धोरण आहे ते गेल्या काही वर्षांमध्ये अडचणीचे झालं आहे. त्या धोरणांमध्ये आपण बदल कराल अशी इच्छा आहे. त्यामुळे राज्याच्या युवक-युवतींना नोकरी मिळेल. शेतकऱ्यांच्या अडचणींकडे लक्ष द्या. आम्ही सर्वजण खूश आहोत. इथली लोकंदेखील खूश आहेत. पण आपण केंद्र सरकारमध्ये थोडेसे बदल करावेत. चारच वर्षे राहिली आहेत. आपण लक्ष द्याल आणि देशाची, जनतेची काळजी घ्याल. आपण बिझी असाल आपला जास्त वेळ घेत नाही. धन्यवाद!” आणि असे म्हणत रोहित पवारांनी फोन ठेवला.

Last Updated : Jan 17, 2020, 7:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details