अहमदनगर - कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आज मतदारसंघात तालुक्यातील विविध विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी 'महाराजस्व' अभियान राबवण्यासंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले. सरकारची प्रत्येक योजना गरजू आणि पात्र नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेल, असा विश्वास यावेळी रोहित पवार यांनी व्यक्त केला.
महाराजस्व अभियानात जनसामान्यांची प्राधान्याने कामे करू - रोहित पवार हेही वाचा - प्रभू श्रीरामाची कृपा..! मुख्यमंत्री ठाकरे पुन्हा करणार अयोध्या वारी
'राज्य सरकार अनेक लोकोपयोगी योजना राबवत असते. पण या सर्व योजना गरजू लोकांपर्यंत पोहोचतातच असे नाही. रेशनकार्ड न मिळणे, चांगल्या उपचारांचा प्राथमिक आरोग्य केंद्रात अभाव, रेशन दुकानातून पुरेसे धान्य न मिळणे, घरकुल अशा अनेक गोष्टींसाठी नागरिकांना झगडावे लागते. त्यासाठी कर्जत-जामखेडमध्ये लाभार्थ्यांची निवड करण्यापासून योजनेची काटेकोर अंमलबजावणी करण्यापर्यंत नियोजन सुरू आहे' अशी माहिती पवार यांनी यावेळी दिली.
हेही वाचा -बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकरी मतदानापासून राहणार वंचित
मोदी-शाहंची तुलना राष्ट्रपुरुषांशी होत असल्यावरही त्यांनी यावेळी भाष्य केले. छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना देशातच काय जगामध्येही कोणाशी होऊ शकत नाही, असे यावेळी त्यांनी ठणकावून सांगितले. मतदारसंघातील एक लाख नागरिकांना शासकीय योजनाचा लाभ देण्याचा मानस रोहित पवार यांनी व्यक्त केला. महाराजस्व अभियानात पासपोर्ट आणि वाहन परवाना देखील मिळणार असल्याने यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले.