महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हक्काची माणसं दुरावू नयेत; दादांनी परत यावं

लवकरच महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येईल पण यात हक्काची माणसं दूरावू नयेत असं व्यक्तिश: वाटत असल्याची भावनीक फेसबुक पोस्ट अजित पवार यांचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी लिहीली आहे.

रोहित पवारांचे अजित पवारांना भावनीक आवाहन

By

Published : Nov 24, 2019, 9:17 PM IST

अहमदनगर - लवकरच महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येईल पण यात हक्काची माणसं दूरावू नयेत असं व्यक्तिश: वाटत असल्याची भावनीक फेसबुक पोस्ट अजित पवार यांचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी लिहीली आहे. शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी फेसबुक अकाऊंटवर एक पोस्ट करून राज्यात लवकरच महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याची माहितीही दिली आहे. त्यांनी आपले काका नाराज अजित पवार यांना परत येण्याचे आवाहन या पोस्टच्या माध्यमातून केले आहे.

हेही वाचा - काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेनेचे आमदार पुन्हा राजस्थानात येण्याचे अशोक गेहलोत यांचे संकेत

रोहित आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात -

लहानपणापासून साहेबांना पहात आलो, प्रश्न राजकीय असो की कौंटुबिक साहेब कधी खचून जात नाहीत. माझे आजोबा अप्पासाहेब पवार गेल्यानंतर वडील राजेंद्र दादांना धीर देणारे साहेब देखील मी पाहिले आहेत आणि अजितदादांचे वडील अनंतराव पवार गेल्यानंतर अजितदादांना सावरणारे साहेबच होते.

रोहित आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात

अजितदादांच्या वडिलांच्या पश्चात दादांच्या लहानपणापासून त्यांना वडिलांचे प्रेम देणारे साहेबच होते. तसेच आदरणीय पवार साहेबांवर अडचण आल्यानंतर खंबीर भूमीका घेणारे अजितदादा देखील आपण पाहिले आहेत. प्रश्न कौटुंबिक असो की राजकीय, खचून जाणं हे साहेबांच्या डिक्शनरीत नाही.

आजच्या घडामोडी पाहताना जूनं चित्र कायम तसच असावं. अजितदादांनी साहेबांचे निर्णय मान्य करावेत व स्वगृही परत यावं असं मनापासून वाटतं. साहेब राजकारण आणि कुटुंब कधीच एकत्र करत नाहीत व ते करणार देखील नाहीत, पण कुठेतरी सर्वसामान्य घरातून एक व्यक्ती “पवार साहेब” होतो. सर्वसामान्यांच्या आवाज होतो व अखेरपर्यंत लढत राहतो तेव्हा या देशातल्या अहंकारी शक्ती तो आवाज दाबू पहात आहेत, अशा वेळी कुटुंबाचा एक घटक म्हणून व्यक्तिशः मला असं वाटतं की आपण सर्वांनी साहेबांच्या सोबत रहायला हवं.

हेही वाचा - अजित पवारांचे बंड कायम.. मनधरणी करण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांना अपयश?

ABOUT THE AUTHOR

...view details