महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Renukamata Temple Robbery : रेणुकामाता मंदिरात धाडसी चोरी, देवीच्या अंगावरील दागिने लंपास - शेवगाव तालुक्यातील रेणुकामाता मंदिरात चोरी

अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यातील रेणुकामाता मंदिरात शुक्रवारी पहाटे चोरी झाली. चोरट्यांनी मुर्तीच्या अंगावरील सोन्या - चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू चोरून नेल्या आहेत. (Robbery in Renukamata temple)

Renuka Temple Robbery
रेणुकामाता मंदिरात चोरी

By

Published : Aug 18, 2023, 10:29 PM IST

शेवगाव (अहमदनगर) :शेवगाव तालुक्यातीलअमरापूर येथे रेणुकामाता मंदिरात चोरीची धाडसी घटना उघडकीस आलीय. चोरट्यांनी देवीच्या अंगावरील सोन्या - चांदीचे दागिने आणि इतर ऐवज चोरल्याची प्राथमिक माहिती आहे. मंदिर परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरटे कैद झाले आहेत. शुक्रवारी पहाटे ही घटना घडली.

शेवगाव पोलीस आणि ठसे तज्ञ घटनास्थळी दाखल : मंदिरात चोरी झाल्याची माहिती मिळताच शेवगाव पोलीस आणि ठसे तज्ञ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील पाटील, पर्यविक्षाधीन सह. पोलीस अधिक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिस निरीक्षक दिनेश आहेर हे देखील घटनास्थळी पोहचले. त्यानंतर त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.

चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद : पोलिसांनी सर्वप्रथम मंदिरात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यात त्यांना दोन चोरटे कैद झाल्याचे आढळले. चोरट्यांनी मंदिराच्या बाहेरील ग्रिलचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी गाभाऱ्याच्या दरवाजाचे कुलूप तोडले. चोरट्यांनी रेणुकामातेच्या मुर्तीच्या अंगावरील सोन्या - चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू चोरून नेल्या आहेत. या दागिन्यांची किंमत लाखो रुपयांच्या घरात असल्याचे सांगण्यात येतंय.

पाच रक्षक गस्तीस असताना चोरी झाली : या प्रकरणी धक्कादायक बाब म्हणजे, चोरी झाली त्या वेळेस तेथे पाच रक्षक रात्रीची गस्त घालत होते. मात्र त्यांना या घटनेची पुसटशीही कल्पना आली नाही. शुक्रवारी सकाळी देवीचे पुजारी मंदिरात पोहचताच त्यांना मंदिरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. हा सर्व प्रकार शुक्रवारी पहाटे घडला आहे. आता पोलिसांनी या प्रकरणी आरोपीच्या अटकेसाठी तपास सुरू केलाय. देवीच्या मंदिरात चोरी झाल्याने, चोरटे लवकरात लवकर पकडले जावे अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

हेही वाचा :

  1. Acid Attack On Dog : बदला घेण्यासाठी महिलेचा कुत्र्यावर अ‍ॅसिड हल्ला, सीसीटीव्हीत धक्कादायक दृष्य कैद
  2. Gujarat Betting Scam : चिनी नागरिकाचा गुजरातमध्ये मोठा स्कॅम! ९ दिवसांत १४०० कोटींची फसवणूक, तब्बल वर्षानंतर प्रकरण जनतेसमोर
  3. Pune Crime News : '...तुझी बायको पॉर्न अ‍ॅक्ट्रेससारखी दिसते' म्हणत सोसायटीच्या लोकांना केला मेल, पुढे झाले असे...

ABOUT THE AUTHOR

...view details