अहमदनगर- नेवासा शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भर दिवसा अडीच लाखांची रक्कम अज्ञात चोरट्यांनी लहान मुलाच्या मदतीने पळवली. ही घटना आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली असून हा प्रकार बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान, या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
नेवासा शहरात भरदिवसा बँकेतून अडीच लाखांची रक्कम पळवली; घटना सीसीटीव्हीत कैद - State Bank of India
नेवासा शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भर दिवसा अडीच लाखांची रक्कम अज्ञात चोरट्यांनी पळवली. ही घटना आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली असून हा प्रकार बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
नेवासा शहरात भरदिवसा बँकेतून अडीच लाखाची रक्कम पळवली; घटना सीसीटीव्हीत कैद
दुपारी एका ग्राहकाने जमा केलेली रक्कम रोखपालने काउंटरवरच ठेवली होती. तेव्हा २ अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवत लहान मुलाच्या मदतीने या रकमेवर डल्ला मारला. मात्र, हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. या घटनेसंदर्भात नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
Last Updated : Jun 20, 2019, 4:52 PM IST