महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संगमनेरमध्ये घरफोडी करून ६ तोळे सोन्यासह अडीच लाख रुपये लंपास - सुकेवाडी

चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून घरामध्ये प्रवेश केला. मात्र, याची घरच्यांना भनकही लागली नाही. घरचे लोक सकाळी झोपेतून उठल्यानंतर चोरी झाल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला.

श्नानाच्या साहाय्याने शोध घेताना पोलीस

By

Published : May 11, 2019, 1:57 PM IST

अहमदनगर - जिल्ह्यातील संगमनेर येथे घरात सर्वजण असताना घरफोडी झाल्याचा प्रकार आज पहाटेच्या सुमारास घडला. यात चोरट्यांनी ६ तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि रोख अडीच लाख रूपये लंपास केले आहेत.

घरफोडी बद्दल माहिती सांगताना रामनाथ कुटे

संगमनेर शहराजवळ असणाऱ्या सुकेवाडी येथील रामनाथ बाळाजी कुटे यांच्या घरात पहाटेच्यासुमारास चोरटे घुसले. त्यांनी अडीच लाख रुपये रोख रक्कम आणि सहा तोळे सोन्याचांदीचे दागिने घेऊन पोबारा केला.
चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून घरामध्ये प्रवेश केला. मात्र, याची घरच्यांना भनकही लागली नाही. घरचे लोक सकाळी झोपेतून उठल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. संगमनेर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी श्वान पथकालाही पाचारण केले. श्वानाने घरापासून १ किलोमीटरपर्यंत चोरांचा माग काढला. मात्र, त्या ठिकाणाहून चोरटे वाहनाने पसार झाल्याची शक्यता आहे.

संगमनेर शहर आणि परिसरात गंठण चोरी, पॉकीटमारी, घरफोडी अशा घटना वाढ झाली आहे. त्यामुळे चोरट्यांना पोलीसांचा धाक राहिला नसल्याचे बोलले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details