महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कडक निर्बंधांमुळे अहमदनगरमधील रस्ते निर्मनुष्य - कोरोना

विनाकारण फिरताना आढळल्यास मनपा प्रशासन, पोलीस अशा व्यक्तींवर गुन्हे दाखल करून वाहने ताब्यात घेतील. तसेच रोख रकमेचा दंड आकारण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आल्याने शहरातील रस्ते निर्मनुष्य दिसून येत होते. तुरळक दुचाकी किंवा रिक्षाचा वावर होत असला तरी पोलीस त्यांची चौकशी करत होते.

कडक निर्बंधांमुळे अहमदनगरमधील रस्ते निर्मनुष्य
कडक निर्बंधांमुळे अहमदनगरमधील रस्ते निर्मनुष्य

By

Published : May 4, 2021, 7:42 AM IST

Updated : May 4, 2021, 8:53 AM IST

अहमदनगर : शहरात दररोज सरासरी आठशे ते हजार रुग्ण आढळून येत असल्याने महानगरपालिका आयुक्तांनी शहरात सात दिवसांचा कडक लॉकडाऊन सोमवार दिनांक 3 मे पासून लागू केला आहे. हा कडक लॉकडाऊन दहा मे रोजी रात्री बारा वाजेपर्यंत असणार आहे.

कडक निर्बंधांमुळे अहमदनगरमधील रस्ते निर्मनुष्य



कडक निर्बंधांमुळे शहरातील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास


राज्यात लॉकडाऊन लागण्यागोदरच नगर जिल्ह्यात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी जनता कर्फ्यू लावला होता. त्यानंतर राज्यात लॉकडाऊन सुरू झाला असला, तरी नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यांवर दिसून येत होते. विशेषतः किराणा माल आणि फळे-भाजीपाला विक्रीला सकाळी सात ते अकरा या वेळेत परवानगी असल्याने या खरेदीच्या नावाखाली नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर येत गर्दी करत होते. भाजी बाजारात तर सोशल डिस्टन्सचा पूर्ण फज्जा उडाल्याचे चित्र दिसत होते. याचाच परिणाम म्हणून शहरातील कोरोना बधितांचा आकडा हा रोज वाढता होता. यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत असल्याने कडक निर्बंध लागू करण्याशिवाय पर्याय नसल्याने मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी तीन मेपासून ते दहा मेपर्यंत असे सात दिवस शहरात कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार यादरम्यान किराणा माल विक्री तसेच फळे, भाजीपाला, अंडी, मटण, मासे विक्रीला पूर्ण बंदी घातली गेली आहे. नागरिकांना केवळ हॉस्पिटल, दवाखाना या कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही. विनाकारण फिरताना आढळल्यास मनपा प्रशासन, पोलीस अशा व्यक्तींवर गुन्हे दाखल करून वाहने ताब्यात घेतील. तसेच रोख रकमेचा दंड आकारण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आल्याने शहरातील रस्ते निर्मनुष्य दिसून येत होते. तुरळक दुचाकी किंवा रिक्षाचा वावर होत असला तरी पोलीस त्यांची चौकशी करत होते.

लसीकरण केंद्रावरील गर्दी कायम


शहरात सात दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करून नागरिकांवर अनेक निर्बंध आणले असले तरी लसीकरणाच्या नावाखाली काही लोक बाहेर पडत आहेत. तसेच लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी दिसून येत आहे. सध्या उन्हाळ्याची तीव्रता असल्याने केंद्राबाहेर उभारलेल्या छोटेखानी मांडवात नागरिक एकमेकांना खेटून उभे राहतात. यातूनही संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Last Updated : May 4, 2021, 8:53 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details