महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नगर-औरंगाबाद महामार्गावर 'रास्तारोको'; वांबोरी-चारी प्रकल्पातून पाण्याची मागणी

नेवासा तालुक्यातील पांढरीपूल येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नगर-औरंगाबाद महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यामुळे नगर-औरंगाबाद रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

By

Published : Sep 5, 2019, 2:01 PM IST

पांढरीपूल येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नगर-औरंगाबाद महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

अहमदनगर- नेवासा तालुक्यातील पांढरीपूल येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नगर-औरंगाबाद रस्त्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

पांढरीपूल येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नगर-औरंगाबाद महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

वांबोरी चारी पाईप लाईन योजनेतून राजेगाव, मोरगव्हाण, मांडेगव्हाण, शिंगवेतुकाई, झापवाडी व पांगरमल या गावांना शेतीसाठी हक्काचे पाणी मिळवण्यासाठी आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली पांढरीपूल येथे हे आंदोलन करण्यात आले. रास्तारोकोमुळे नगर-औरंगाबाद रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

हेही वाचा शिक्षणाचा खेळखंडोबा; १२५ विद्यार्थ्यांमागे शिक्षक मात्र दोनच, विद्यार्थ्यांनी केला रास्तारोको

बुधवारी साडेदहाच्या सुमारास या रस्ता रोको आंदोलन सुरुवात करण्यात आली होती. यावेळी संबंधित योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नेवासा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांच्याकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

हेही वाचा वर्ध्यात बसफेरीसाठी विद्यार्थ्यांचा चांदणी फाट्यावर रास्तारोको, आश्वासनानंतर आंदोलन मागे

कमी पर्जन्य प्रदेशात असणाऱ्या आठ ते दहा गावांवर सतत अन्याय झाल्याची स्थानिकांची भावना आहे. गावामध्ये कायमस्वरूपी दुष्काळ परिस्थितीमुळे टँकर साठी शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च होत असतात. यापेक्षा वांबोरी चारी येथून पाणी मिळण्याच्या मागणीसाठी जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांच्या नेतृत्वाखाली हा रास्ता रोको करण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details