कोरोनामुळे शाळा बंद.. पालकांना देण्यात आले पोषण आहाराचे तांदूळ व कडधान्य - तांदुळ व कडधान्य
लॉकडाऊनमुळे जिल्हा परिषद शाळांमधून मुलांना पोषण आहारासाठी दिला जाणारा तांदूळ व कडधान्यांचा साठा तसाच पडून आहे. हे धान्य वितरीत करण्याचे आदेश आल्यानंतर आज नगर जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये पहिली ते सातवीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत बोलावून त्यांना धान्य देण्यात आले.
![कोरोनामुळे शाळा बंद.. पालकांना देण्यात आले पोषण आहाराचे तांदूळ व कडधान्य rice and Pulses distrubution students parents in nagar](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6610352-thumbnail-3x2-123.jpg)
शिर्डी (अहमदनगर)- जिल्हा परिषद शाळांमधून मुलांना पोषण आहार पुरविला जातो, मात्र सध्या लॉकडाऊनमुळे शाळा बंद करण्यात आल्याने अनेक शाळांना पोषण आहारासाठी देण्यात आलेला तांदूळ आणि कडधान्यांचा साठा शाळांकडे तसाच पडून आहे. त्यामुळे हे सर्व धान्य त्या शाळेतील विद्यार्थ्यांना वाटण्याचे आदेश आल्यानंतर आज अहमदनगर जिल्ह्यातील अनेक शाळामधील पहिली ते सातवीपर्यंत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत बोलवून कडधान्य व तांदूळ देण्यात आले.
शासन आदेशाने शाळेत शिल्लक तांदूळ व कडधान्य ( हरभरा, मूगडाळ, मटकी, आणि तूरडाळ) वितरीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या मात्र लॉकडाऊनचे पालन व्हावे आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला जावा, यासाठी सदर धान्यवाटप करताना वेळ ठरवून देण्यात आली होती. त्याच बरोबरीने शाळेतील मैदानावर दोन पालकांमधील अंतर हे एक-एक मीटर राहील याचीही दक्षता घेण्यात आली होती.