अहमदनगर -सहा महिन्यात सरकार कोसळणार, दोनशे वीस जागा येणार, विरोधीपक्ष नेता करता येईल एवढ्या पण जागा विरोधकांना मिळणार नाही, असे भाष्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करीत होते. मात्र, त्यांचे भविष्य खोटे ठरले आहे. आता त्यांनी चांगला भविष्यवाला शोधावा, असा टोला राज्याचे महसूलमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी लगावला. आज (११ जानेवारी) ला अहमदनगर येथे ते माध्यमांशी बोलत होते.
'फडणवीसांचे सर्व अंदाज चुकतात, त्यांनी चांगला भविष्यवाला शोधावा'
आरोप करायचा पिंड हा अनेक वर्षे विरोधातच राहिलेल्या भाजपचा राहिला आहे. आता पुन्हा ते विरोधात बसल्याने आम्ही केलेल्या चांगल्या कर्जमाफीला विरोध करत आहेत, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
आरोप करायचा पिंड हा अनेक वर्षे विरोधातच राहिलेल्या भाजपचा राहिला आहे. आता पुन्हा ते विरोधात बसल्याने आम्ही केलेल्या चांगल्या कर्जमाफीला विरोध करत आहेत. विदर्भातील शेतकरी आत्महत्या ही नेहमीच चिंतेची बाब राहिली आहे. आमच्या काळात त्या कमी झाल्या होत्या. मात्र, मध्यंतरी त्यात पुन्हा वाढ झाली असली तरी आता महाविकास आघाडी कर्जमाफीसारख्या योजना राबवून विदर्भ-मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे, असेही थोरात म्हणाले.