महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेवगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर, "कही खुशी; कही गम" - local government body elections in nagar

शेवगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आज पालिकेची प्रभाग निहाय आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली. प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांच्या उपस्थितीत शेवगाव तहसील कार्यालयात ही सोडत पार पडली.

शेवगाव नगरपरिषद निवडणूक
शेवगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर, "कही खुशी; कही गम"

By

Published : Nov 27, 2020, 5:11 PM IST

अहमदनगर - शेवगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आज पालिकेची प्रभाग निहाय आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली. प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांच्या उपस्थितीत शेवगाव तहसील कार्यालयात ही सोडत पार पडली. आज निघालेल्या आरक्षणामध्ये अनेक मात्तबरांचे प्रभाग आरक्षित झाल्याने त्यांचा हिरमोड झाला. त्यामुळे ‘कही खुशी, कही गम’ची स्थिती पहायला मिळत आहे.

शेवगाव पालिकेची प्रभाग निहाय आरक्षण सोडत तहसील कार्यालयात प्रांताधिकारी देवदत्त केकाण, पालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आंबादास गर्कळ, अव्वल कारकून नितीन बनसोडे यांच्यासह इच्छुकांच्या उपस्थितीत काढण्यात आली. यावेळी कुमारी साक्षी व कुमारी सीफा यांच्या हाताने चिठ्ठ्या काढून आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.

पालिकेची प्रभागनिहाय आरक्षण सोडत पुढील प्रमाणे

प्रभाग 1- खुला, प्रभाग 2- खुला, प्रभाग 3- खुला, प्रभाग 4- खुला, प्रभाग 5- सर्वसाधारण स्त्री, प्रभाग 6- सर्वसाधारण स्त्री, प्रभाग 7- नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग 8- सर्वसाधारण महिला, प्रभाग 9- अनुसूचित जाती व्यक्ती, प्रभाग 10- सर्वसाधारण महिला, प्रभाग 11- खुला, प्रभाग 12- सर्वसाधारण महिला, प्रभाग 13- नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव, प्रभाग 14- नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग 15- सर्वसाधारण स्त्री, प्रभाग 16- नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव, प्रभाग 17- नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव, प्रभाग 18- खुला, प्रभाग 19- अनुसूचित जाती स्त्री राखीव, प्रभाग 20- नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग 21- अनुसूचित जाती स्त्री राखीव.

नगरपरिषद निवडणुकीत 50 टक्के जागा राखीव आहेत. यामध्ये महिला व पुरुषांना 50-50 टक्के आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. या आरक्षणामध्ये अनेकांचा हिरमोड झाला आहे. अनेकांच्या नजरा आरक्षणाकडे होत्या. अखेर ही सोडत जाहीर झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details