अहमदनगर - महाविकास आघाडी सरकारने मंदिर उघडण्याच्या भाविकांच्या मागणीचा अनादर केला असून, याबाबतचा निर्णय जाणीवपूर्वक दुर्लक्षित केला आहे. मंदिर बंद असल्याने तिर्थक्षेत्रांच्या ठिकाणी व्यावसायिकांवर आलेल्या अर्थिक संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंदिर सुरू करण्याचे निर्देश आपणच सरकारला द्यावेत, अशी मागणी माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यपालांकडे केली आहे.
राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन मंदिर सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन दिले आणि तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी व्यावसायिकांवर ओढवलेल्या अर्थिक संकटाचे वास्तव त्यांच्या निदर्शनास आणून दिले. राज्य सरकारने अनलॉकचे निर्णय करताना सर्वच अस्थापना सुरू करण्याचे निर्णय घेतले. दारूच्या दुकानापासून ते जिम सुरू करण्यास सांगितले गेले. आठवडी बाजारांसह माॅल आणि शासकीय कार्यालयातील उपस्थिती बाबतही सरकार निर्णय करते. परंतु, मंदिर सुरू करण्याच्या मागणीकडे मात्र महाविकास आघाडी सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची बाब विखे पाटील यांनी राज्यपालांकडे स्पष्ट केली.
हेही वाचा -ईटीव्ही भारत विशेष : लॉकडाऊन काळात मुंबईत महिलांविरुद्धच्या हिंसाचार वाढला