महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Remove BJP RSS to save democracy : भाजप आरएसएस हटाव लोकशाही बचाव, नगरमध्ये समविचारी पक्षांचा सत्याग्रह - काळ्या फिती बांधून लोकशाही बचाव सत्याग्रह

राहुल गांधींच्यावरील कारवाईचे पडसाद अहमदनगरमध्येही उमटले. तिथे काँग्रेससह समविचारी पक्षांनी सत्याग्रह आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादीच्या आमदारांना मात्र आंदोलनातील सहभागासाठी आमंत्रण दिले गेलेले नव्हते.

नगरमध्ये समविचारी पक्षांचा सत्याग्रह
नगरमध्ये समविचारी पक्षांचा सत्याग्रह

By

Published : Mar 27, 2023, 3:48 PM IST

अहमदनगर - काँग्रेस नेते राहुल गांधींवर संसदेच्या सचिवालयाने तडकाफडकी सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई केल्यानंतर त्याचे नगरमध्ये तीव्र पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. भाजप, आरएसएस हटाव, लोकशाही बचावचा नारा देत समविचारी पक्षांनी रस्त्यावर उतरत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर काळ्या फिती बांधून लोकशाही बचाव सत्याग्रह केला आहे.

पहिल्यांदाच शहर काँग्रेससह शहर शिवसेना उद्धव ठाकरे गट, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, आम आदमी पार्टी, नगर तालुका काँग्रेस, तालुका राष्ट्रवादी व शिवसेना ठाकरे गट, सैनिक समाज पार्टी, ऑल इंडिया युथ फेडरेशनसह सामाजिक, राजकीय चळवळीतील विविध घटक, गट, समूहांचे कार्यकर्ते सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे राजकारणाशी निगडीत नसणाऱ्या नागरिकांनी देखील या सत्याग्रहामध्ये सहभाग घेतला. सुरुवातीला महिला कार्यकर्त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आला. यावेळी दंडाला कळ्या फिती बांधून मोदी सरकारच्या निषेध करण्यात आला.

यावेळी वक्त्यांनी आक्रमक भाषणे केली. हिंडेनबर्गने आदानी उद्योग समूहावर केलेल्या आरोपांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. देशाच्या पंतप्रधानांचे आणि उद्योगपती अदानींचे नेमके संबंध काय ? हा प्रश्न विचारण्यात आला. कारस्थान रचून राहुल गांधींवर कारवाई सुरूबुद्धीने कारवाई केली गेली. गांधींचा संसदेत घुमणारा निर्भीड आवाज दाबण्यासाठी त्यांच्यावर संबंध भाजप तुटून पडली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी सत्याग्रहींच्या हातामध्ये अदानींच्या खासगी विमानातील देशाच्या पंतप्रधानांचे राहुल गांधींनी संसदेत दाखवलेले फोटो सत्याग्रहींच्या हातामध्ये झळकत होते. राष्ट्रगीताने सत्याग्रहाची सांगता करण्यात आली.

शहर राष्ट्रवादीसह आमदारांना निमंत्रण नाही : राज्यात महाविकास आघाडी असली तरी नगर शहरातील राष्ट्रवादीसह आमदारांना निमंत्रण देण्यात आले नसल्याची माहिती समोर आली आहे. शहराच्या आमदारांचा भाजपच्या खासदारांसमवेत असणारा जाहीर वावर, तसेच भाजप प्रणित संघटनांच्या कार्यक्रमांना असणारी जाहीर उपस्थिती यामुळे त्यांना टाळण्यात आल्याची कुजबूज सत्याग्रहस्थळी कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती. त्यामुळे हे आंदोलन जरी झाले असले, तरी त्यालाही एक राजकारणाची वेगळी किनार असल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा - Trupati Desai on Indurikar Maharaj : 'गौतमी पाटीलचे नाव घेऊन इंदुरीकर स्वतःचे महत्त्व वाढवतात, तुम्हीच पैशाचाच बाजार मांडला'

ABOUT THE AUTHOR

...view details