महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बहुचर्चित रेखा जरे खून प्रेमसंबधांतून, बाळ बोठेसह ६ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल, १२ लाखांत दिली होती सुपारी - rekha jare murder in love affair news

पोलिसांनी बाळ बोठेसह अन्य ६ आरोपीविरोधात पारनेर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. या ६ आरोपीविरोधात कलम 212 अन्वये कारवाई केली. या आरोपींनी बोठे याला फरार करण्यास मदत केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. जरे यांच्या हत्येची सुपारी 12 लाखांची दिली होती.

Rekha Jare's murder in love affair
रेखा जरेंचा खून प्रेमसंबधांतून

By

Published : Jun 9, 2021, 1:59 PM IST

Updated : Jun 9, 2021, 3:09 PM IST

अहमदनगर - यशस्विनी ब्रिगेडच्या यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हिचा खून प्रेमसंबंधातून झाल्याचे पोलिसांनी दोषारोपपत्रात स्पष्ट केले. रेखा जरे या प्रेमसंबंधातून आपली बदनामी करेल, अशी भीती बाळ बोठे याला वाटत होती. यामुळेच बोठे याने सुपारी देऊन रेखा जरे हिचा खून करण्यात आला.

12 लाख रुपयांत दिली होती सुपारी -

पोलिसांनी बाळ बोठेसह अन्य ६ आरोपीविरोधात पारनेर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. या ६ आरोपींविरोधात कलम 212 अन्वये कारवाई केली. या आरोपींनी बोठे याला फरार करण्यास मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. जरे यांच्या हत्येची सुपारी 12 लाख रुपयांमध्ये दिली होती. जरे यांची हत्या रात्री 8 ते सव्वा आठच्या सुमारास झाल्यानंतर हे 12 लाख रूपये आरोपी बोठे याने आरोपी सागर भिंगारदिवे याला दिले. त्यानंतर तो सिव्हीलमध्ये गेला. सागर भिंगारदिवे याने साडेतीन लाख रूपये चोळके याला दिले. त्यानंतर काही पैसे घरी ठेऊन भिंगारदिवे कोल्हापूरला फरार झाला. नंतर चोळके याने प्रत्यक्षात हत्या करणारे इतर दोन आरोपींना प्रत्येकी 50-50 हजार रुपये दिले.

हेही वाचा -संतापजनक! शेजारी राहणाऱ्या 70 वर्षीय नराधमाकडून 10 वर्षीय बालिकेवर वारंवार अत्याचार

पोलिसांनी जे दोषारोपपत्र दाखल केले आहे त्यामध्ये 26 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. यापैकी शुभम गायकवाड, राजेश परकाळे, डॉ. मकासरे आणि काही प्रमुख लोकांचे जबाब आहेत. जरे यांच्या हत्येचा कट कुठे रचला, त्यासाठी पैसे कोठून आणले या सगळ्या गोष्टींचा खुलासा पोलिसांनी या दोषारोपपत्रमध्ये केला आहे.

Last Updated : Jun 9, 2021, 3:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details