महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रेखा जरे हत्याकांड : रुणाल जरे यांच्या आंदोलनाला तृप्ती देसाईंचा पाठिंबा - रुणाल जरे उपोषण आंदोलनाला तृप्ती देसाईंचा पाठिंबा

रेखा जरे हत्येतील मुख्य सूत्रधार मास्टरमाईंड असलेला वरिष्ठ पत्रकार बाळ बोठे हा तीन महिन्यापासून फरार असून पोलीस त्याला अटक करू शकलेले नाहीत. त्याला तात्काळ अटक व्हावी, यासाठी रेखा जरे यांच्या मुलाने आज शुक्रवारपासून उपोषण आंदोलन सुरू केले आहे. रुणाल जरे यांच्या या उपोषण आंदोलनाला पुण्याच्या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी पाठिंबा दिला आहे.

रुणाल जरे यांच्या आंदोलनाला तृप्ती देसाईंचा पाठिंबा
रुणाल जरे यांच्या आंदोलनाला तृप्ती देसाईंचा पाठिंबा

By

Published : Mar 5, 2021, 5:23 PM IST

Updated : Mar 5, 2021, 5:28 PM IST

अहमदनगर - रेखा जरे हत्येतील मुख्य सूत्रधार मास्टरमाईंड असलेला वरिष्ठ पत्रकार बाळ बोठे हा तीन महिन्यापासून फरार असून पोलीस त्याला अटक करू शकलेले नाहीत. त्याला तात्काळ अटक व्हावी, यासाठी रेखा जरे यांच्या मुलाने आज शुक्रवारपासून उपोषण आंदोलन सुरू केले आहे. रुणाल जरे यांच्या या उपोषण आंदोलनाला पुण्याच्या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी पाठिंबा दिला आहे.

बोठेला मदत करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा -

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी याबाबत एक निवेदन प्रसिद्ध केले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या रेखा जरे यांच्या निर्घृण हत्येला तीन महिने उलटले आहे. मात्र पोलिसांना या हत्येचा मुख्य सूत्रधार असलेला आरोपी बाळ बोठे सापडलेला नाही. पोलिसांना बोठे सापडत नसल्याने नक्कीच त्याच्या मागे मोठ्या शक्ती आहेत. ज्या त्याला लपवून ठेवण्यास मदत करत आहेत. जरे कुटुंबाने या प्रकरणात राजकीय दबाव असल्याचाही आरोप केला आहे. त्यामुळे पोलिसांनी आरोपी बाळ बोठेला शोधून काढून अटक करावी तसेच त्याला तीन महिने लपून ठेवण्यात मदत करणाऱ्या शक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावरही गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली आहे. तसेच बाळ बोठे याची मालमत्ता जप्त करावी अशीही मागणी त्यांनी केली आहे. भूमाता ब्रिगेड जरे कुटुंबाच्या पाठीमागे खंबीरपणे उभी असून रुणाल जरे करीत असलेल्या आंदोलनाला आमचा पाठिंबा असल्याचे देसाई यांनी म्हटले आहे.

भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई
आंदोलनाला सामाजिक संघटनांचा पाठिंबा -

रुणाल जरे यांनी आज शुक्रवारपासून अहमदनगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर उपोषण आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाला जनाधार संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पोटे, भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई, सामाजिक कार्यकर्ते गोरख आढाव अशा अनेक सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

३० नोव्हेंबर रोजी झाली होती हत्या -

यशस्विनी ब्रिगेड या महिलांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून रेखा जरे काम करत होत्या. नगरमध्ये काढण्यात आलेल्या मराठा क्रांती मोर्चात त्यांनी जिल्ह्यातून महिलांचे मोठे संघटन मोर्चात उतरवले होते. त्या आई आणि मुलासोबत पुण्याहून नगरकडे परतत असताना 30 नोव्हेंबर 2020 रोजी त्यांचा वाटेत जातेगाव घाटात निर्घृण खून करण्यात आला होता. तपासात पोलिसांनी पाच आरोपींना अटक केल्यानंतर या नियोजनबद्ध हत्याकांडाचा सूत्रधार वरिष्ठ पत्रकार बाळ बोठे असल्याचे पुढे आले. त्यानंतर त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, मात्र बोठेला अटक करण्यापूर्वीच तो फरार झाला आहे.

Last Updated : Mar 5, 2021, 5:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details