अहमदनगर- राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या कोपर्डी निर्भया अत्याचार प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयात २५ फेब्रुवारी पासून नियमित सुनावणी होणार आहे. याबाबत उच्च न्यायालयाने सुनावणीत दिरंगाई होईल, असा प्रयत्न चालवून घेतला जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
कोपर्डी प्रकरणाची नियमित सुनावणी; मराठा क्रांती मोर्चा आरोपींना फाशी होईपर्यंत करणार पाठपुरावा - कोपर्डी अत्याचार प्रकरणी
राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या कोपर्डी निर्भया अत्याचार प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयात २५ फेब्रुवारी पासून नियमित सुनावणी होणार आहे. याबाबत उच्च न्यायालयाने सुनावणीत दिरंगाई होईल, असा प्रयत्न चालवून घेतला जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
उच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे कोपर्डी प्रकरण चर्चेत आणून मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सतत पाठपुरावा करणारे शिव प्रहार संघटनेचे अध्यक्ष संजीव भोर यांनी समाधान व्यक्त केले आहे.
आरोपींच्यावतीने खटला कसा लांबला जाईल, यासाठी प्रयत्न होत होते. सरकारी वकिलांनी ही बाब न्यायालयासमोर आणून दिल्याचे भोर यांनी सांगितले.
मराठा क्रांती मोर्चाची लीगल टीम कोपर्डी प्रकरणाची उच्च न्यायालयात निकाल लागून तिन्ही आरोपींना फाशी होऊस्तोवर पाठपुरावा करेल, अशी माहितीही संजीव भोर यांनी दिली.