अहमदनगर -राज्यामध्ये नुकतीच 5200 पोलीसांची भरती प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. त्यानंतर आता 7200 पोलिसांची मेगा भरती होणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ( Maharashtra Police Recruitment ) दिली. ते अहमदनगर मध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
5200 पोलीस लवकरच सेवेत रुजू
दिलीप वळसे पाटील म्हणाले की, "राज्यातील 5200 पोलिसांची भरती प्रक्रिया पुर्ण होत आलेली आहे. त्यांचे लेखी आणि शारीरिक चाचण्या झाल्या असून, यातील निवड कर्मचारी लवकरच कामावर रुजू होतील. तसेच, आता नव्याने 7200 पोलीस पदे भरली जाणार ( Dilip Walase Patil On Police Recruitment ) आहेत. यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी भेटली असून, लवकरच मेगा भरती प्रकिया राबवली जाणार आहे," अशी माहितीही त्यांनी दिली.