अमरावती- विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा तालुक्यात मागील दोन महिन्यांत विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी १४ सप्टेंबरपर्यंत एकूण १६४९ मिमी पाऊस झाल्याचे समोर आले आहे.
विदर्भाचे नंदनवन चिखलदरामध्ये दोन महिन्यात विक्रमी पावसाची नोंद - चिखलदऱ्यात विक्रमी पाऊस
दरवर्षी दुष्काळाने होरपळणाऱ्या मेळघाटातील पिके सध्या अतिवृष्टीमुळे कोमजू लागली आहेत. चिखलदरा तालुक्यात सरासरी १५२६.७ इतका पाऊस अपेक्षित असतो. परंतु, शनिवारपर्यंत चिखलदरा तालुक्यात विक्रमी १६४९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
यंदा संपूर्ण महाराष्ट्रच कडक उन्हाने भाजून निघाला आहे. अशातच जूनमध्ये येणारा पाऊस हा एक महिना उशिरा आला. जुलै महिन्याच्या अखेरीस आलेला जोरदार पाऊस मात्र, विदर्भाच्या नंदनवनात दोन महिन्यांपासून मुक्कामाला थांबला. दरवर्षी दुष्काळाने होरपळणाऱ्या मेळघाटातील पिकांची सध्या अतिवृष्टीमुळे नासाडी होऊ लागली आहे. चिखलदरा तालुक्यात सरासरी १५२६.७ इतका पाऊस अपेक्षित असतो. परंतु, शनिवारपर्यंत चिखलदरा तालुक्यात तब्बल १६४९ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील दमदार पावसामुळे अप्पर वर्धा, चंद्रभागा, शहानुर, पूर्णा, सपण प्रकल्प पूर्ण भरल्याने त्यातुन पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.