महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोपरगाव-कोल्हार महामार्गावर प्रंचड खड्डे, शिर्डीतील तरुणांचे 'रॅपलींग' आंदोलन - कोपरगाव-कोल्हार महामार्गावर प्रंचड खड्डे

कोपरगाव ते कोल्हार जर कोणी मोटारसायरलवर जावून सुरक्षित आला तर त्याचा सत्कार करत फोटो सोशल मीडियावर टाकत रस्त्याची दुरावस्था मांडली जात आहे. एव्हढेच नाही तर थरार नगर - मनमाड रस्त्याचा म्हणून शिर्डीतील काही तरुणांनी दोरखंड आणि डोक्याला लावायची बॅटरी घेवुन या रसत्यावर सरपट प्रवास करत हा रस्ता किती अवघड आहे हे दाखविण्याचा प्रयत्न केलाय.

rappelling agitation of youth in shirdi for demand of repair kopargaon kolhar high way in ahmednagar
शिर्डीतील तरुणांचे 'रॅपलींग' आंदोलन

By

Published : Oct 27, 2020, 7:13 PM IST

शिर्डी (अहमदनगर) - करोडो भाविकांचे श्रद्धा स्थान असलेल्या शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांना विमानाने सहज येता येत आहे. मात्र रस्त्याने गाडी घेऊन येणे म्हणजे अवघड झाले आहे. कोपरगाव - कोल्हार या महामार्गावर प्रंचड खड्डे पडलेले असुनही दुरुस्ती होत नसल्याने आज शिर्डीतील काही तरुणांनी दोरखंड बॅटरी अशा साहित्यासह या महामार्गावर रॅपलींग आंदोलन करत सरकारच लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

शिर्डीतील तरुणांचे 'रॅपलींग' आंदोलन
अहमदनगर - मनमाड हा महामार्ग देशातील उत्तर आणी दक्षिण भारताला जोडणारा महत्वाचा महामार्ग आहे. तसेच या महामार्गावर शिर्डी आणि शनिशिंगणापूर सारखे महत्त्वाचे धार्मिक तीर्थस्थळे आहे. मात्र, गेल्या वीस वर्षाहून अधिक काळापासून या महामार्गावरून प्रवास करताना मालवाहतूकदार आणि कार चालक यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतोय. कोपरगाव - कोल्हार हा महामार्ग खराब झाला म्हणून सरकारने उशिरा का होईना या रस्ताचे बीओटी तत्वावर काम केले. मात्र, त्यातही दर्जा न राखला गेल्याने रस्ता काही वर्षातच खराब झाला असून सध्या या रस्त्यावरुन कोपरगाव ते कोल्हार गाडी घेवून जाणे म्हणजे स्वत:हून मृत्यूच्या दारात ढकलून देणे अशी स्थिती झाली आहे.राज्य सरकारकडून जनतेला रस्ता दुरुस्तीचे केवळ गाजर दाखवले जातय. तर रस्त्याचा दुरूस्ती संदर्भात शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर उच्च न्यायलयाने सूनवाणी करत राज्यसरकारने जानेवारी पर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे. मात्र, आज या कोपरगाव - कोल्हार रस्त्यावरुन जाताना जणू एखादा अवघड घाट उतरल्या सारखे किवा एखादा डोंगर चढणे जसे अवघड असते तशी स्थिती झाली आहे. कोपरगाव ते कोल्हार जर कोणी मोटारसायरलवर जावून सुरक्षित आला तर त्याचा सत्कार करत फोटो सोशल मीडियावर टाकत रस्त्याची दुरावस्था मांडली जात आहे. एव्हढेच नाही तर थरार नगर - मनमाड रस्त्याचा म्हणून शिर्डीतील काही तरुणांनी दोरखंड आणि डोक्याला लावायची बॅटरी घेवुन या रसत्यावर सरपट प्रवास करत हा रस्ता किती अवघड आहे हे दाखविण्याचा प्रयत्न केलाय.

ABOUT THE AUTHOR

...view details