महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भूतबाधा झाल्याचे सांगत मांत्रिकाचा विवाहितेवर अत्याचार, गुन्हा दाखल - Savitra Baburao Gadakh

तालुक्यातल्या पारेगाव बु. येथील 55 वर्षीय मांत्रिकाने 45 वर्षीय विवाहितेला भूतबाधा झाल्याचे सांगत, तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पीडितेने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल होताच पोलिसांनी बलात्कारासह जादुटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून, या मांत्रिकाला अटक केली आहे.

मांत्रिकाचा विवाहितेवर अत्याचार
मांत्रिकाचा विवाहितेवर अत्याचार

By

Published : May 11, 2021, 3:33 PM IST

संगमनेर :तालुक्यातल्या पारेगाव बु. येथील 55 वर्षीय मांत्रिकाने 45 वर्षीय विवाहितेला भूतबाधा झाल्याचे सांगत, तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पीडितेने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल होताच पोलिसांनी बलात्कारासह जादुटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून, या मांत्रिकाला अटक केली आहे. सावित्रा बाबुराव गडाख असे या मांत्रिकाचे नाव आहे.

संगमनेर तालुक्यातील माहेर आणि नाशिक जिल्ह्यातील सासर असलेल्या एका 45 वर्षीय विवाहितेच्या भावाने आपली बहीण सतत अशक्त राहते, तिला चक्कर येतात या कारणाने पाच वर्षांपूर्वी पारेगाव बु. येथील भोंदू मांत्रिक सावित्रा बाबुराव गडाख याच्याकडे आणले होते. यावेळी बाबाने मंत्रतंत्र करून तिच्या अंगावरून लिंबू ओवाळून फेकले. सोबत तिला ताईतही बांधला व अंगारा-धुपाराही दिला व तो पाण्यातून घेण्यास सांगितला. त्यानंतर संबंधित पीडितेने आपल्या घरी जाऊन त्याप्रमाणे केले असता काही दिवस तिला आराम वाटल्यासारखे जाणवले. इतकी वर्ष औषधोपचार करून, हजारो रुपये खर्च करूनही गुण आला नाही. पण बाबाच्या अंगारा-धुपार्‍याने गुण आल्याचे समजूत झाल्याने संबंधित विवाहिता आपल्या पतीसह नेहमी पारेगाव बु. येथे भोंदू मांत्रिक बाबा सावित्रा गडाख यांच्याकडे येत होती. अलीकडच्या काळात संबंधित बाबा या दाम्पत्याला पारेगावला येताना दारूच्या बाटल्या घेऊन येण्यास सांगत असे. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते.

दारू पाजून पीडितेवर अत्याचार

मात्र एप्रिलमध्ये संबंधित विवाहितेचे दुखणे वाढल्याने 23 एप्रिल रोजी त्यांनी बाबाला फोन करून त्याबाबत सांगितले. त्यावर बाबाने दारूच्या बाटल्या, भेळीचा पुडा व बिडीचे बंडल घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार सदरचे दाम्पत्य आपल्या मुलासह रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बाबाच्या वस्तीवर पोहोचले. मात्र त्या ठिकाणी आधीच माणसे आलेली असल्याने त्यांचे काहीतरी काम सुरू होते. रात्री एक वाजण्याच्या सुमारास बाबाने सदर विवाहितेला पती व मुलासह बोलवले.यावेळी संबंधित महिलेला भूतबाधा झाली असून, भूत उतरवावे लागेल. त्यासाठी तिला दारू पाजावी लागेल, असे सांगून त्याने बळजबरीने पीडितेचे दोन्ही हात धरून तिला दारू पाजली. त्यानंतर त्याने दिला एकटीलाच आपल्या शेतातील पोल्ट्री फार्मच्या पाठीमागील बाजूस नेले व तिच्यावर अत्याचार केला. त्यावेळी या महिलेने हे पाप आहे असे त्या भोंदूबाबाला सांगितले, मात्र मद्यधुंद बाबाने त्या महिलेचे काहीच ऐकूण घेतले नाही. तसेच तिला आणखी दोन वेळा इथे यावे लागेल असं या महिलेच्या घरच्यांना या बाबाने सांगितले.

मांत्रिकाचा विवाहितेवर अत्याचार

पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न

या सर्व प्रकाराने पीडिता प्रचंड घाबरली होती. पीडितेने झालेला सर्व प्रकार आपल्या पतीला सांगितला. पीडिता या प्रकाराने चांगलीच घाबरली होती. याचदरम्यान तिने गळफास घेऊन आत्महत्येचा देखील प्रयत्न केला. मात्र तिचा पती वेळीच आल्याने अनर्थ टळला.

भोंदू बाबाला अटक

मात्र त्याच दरम्यान, त्यांच्या कुटुंबात अनेक जणांना कोविडचे संक्रमण झालेले असल्याने बराच मोठा काळ रुग्णालय आणि विलगीकरण कक्षातच गेला. त्यामुळे त्यांना फिर्याद देण्यास उशीर झाला. काल दुपारी त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव रंजना गवांदे-पगार यांच्याशी संपर्क साधून घडला प्रकार कथन केला. त्या नंतर संबंधित 45 वर्षीय पीडितेच्या तक्रारीवरून पारेगाव बु. येथील सावित्रा बाबुराव गडाख या 55 वर्षीय भोंदू मांत्रिकाविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 376 सह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबतचे अधिनियम 2013 चे कलम 3(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सावित्रा गडाख याला पारेगाव बुद्रुक येथील त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आले आहे. पुढिल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा -तेलंगाणामध्ये १२ मेपासून १० दिवसांचा लॉकडाऊन जाहीर

ABOUT THE AUTHOR

...view details