महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिर्डी: राणी मुखर्जीने साई समाधीचे घेतले दर्शन, समाधीवर झाल्या नतमस्तक

साईभक्तीमुळे राणी मुखर्जीने शिर्डीत एक प्लॉट घेतला आहे. मध्यतंरी शर्तभंग झाल्याच्या कारणाने दंड भरून सात बारा उताऱ्यावर राणीला आपले नाव लावून घ्यावे लागले होते. त्या जागेवर तुम्ही बंगला कधी बांधणार, या प्रश्नावर तुम्हीच साईबाबांना प्रार्थना करा, असे राणीने सांगितले.

ahmadnagar
अभिनेत्री राणी मुखर्जी

By

Published : Dec 16, 2019, 8:32 PM IST

अहमदनगर- शिर्डी साईबाबांच्या परमभक्त असलेल्या सिने अभिनेत्री राणी मुखर्जीने आज शिर्डीत साई समाधीचे दर्शन घेतले. यावेळी राणी मुखर्जींनी साईबाबांची मनोभावे प्रार्थना केली. साई समाधीचे दर्शन घेताना राणी अतिशय भावूक झाल्या होत्या. याबाबत विचारले असता ही साई बाबा आणि माझ्यातील बाब आहे. ते आमच्यातच राहू द्या, असे राणीने सांगितले.

प्रतिक्रिया देताना अभिनेत्री राणी मुखर्जी

साईभक्तीमुळे राणी मुखर्जीने शिर्डीत एक प्लॉट घेतला आहे. मध्यतंरी शर्तभंग झाल्याच्या कारणाने दंड भरून सात बारा उताऱ्यावर राणीला आपले नाव लावून घ्यावे लागले होते. त्या जागेवर तुम्ही बंगला कधी बांधणार, या प्रश्नावर तुम्हीच साईबाबांना प्रार्थना करा. त्याचबरोबर, साईभक्त असूनही लग्नानंतर मुलीचा जन्म झाल्यामुळे तसेच, गेल्या १० वर्षानंतर राणीला साईंचे बोलवणे आल्याने मला आज येण शक्य झाल्याचे राणी मुखर्जीने सांगितले. शिर्डी साईबाबांच्या माध्यान्ह आरतीनंतर राणी मुखर्जी साई समाधीवर नतमस्तक झाल्या होत्या. साई दर्शनानंतर साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी दिपक मुंगळीकर यांनी राणीला साई मूर्ती तसेच साई चरित्र आणि येणारे नवीन वर्षाचे कॅलेंडर देऊन सन्मानीत केले.

हेही वाचा-शिंदे-कर्डीलेंच्या उघड नाराजीने भाजपमध्येच विखे एकाकी... स्थानिक राजकारणावर परिणाम?

ABOUT THE AUTHOR

...view details