महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Rani Mukherjee Visit Sai Temple : राणी मुखर्जीने घेतले साईंबाबांचे दर्शन - राणी मुखर्जी साईचरणी

सिनेअभिनेत्री आणि साईभक्त असलेल्या राणी मुखर्जी (Rani Mukharjee Shirdi visit ) हिने गुरुवारी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे. याच बरोबरीने साईंच्या दुपारच्या मध्यान आरतीलाही उपस्थित होती.

Rani Mukherjee
Rani Mukherjee

By

Published : May 12, 2022, 3:34 PM IST

अहमदनगर :सिनेअभिनेत्री आणि साईभक्त राणी मुखर्जी (Rani Mukharjee Shirdi visit ) हिने गुरुवारी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे. याच बरोबरीने साईंच्या दुपारच्या मध्यान आरतीलाही उपस्थित होती. गेल्या अनेक वर्षांपासून साई दर्शनासाठी येऊ न शकलेली अभिनेत्री राणी मुखर्जी साई चरणी नतमस्तक झाली.

राणी मुखर्जी प्रतिक्रिया
घर बांधणे ही साईंची इच्छा
साई चरणी काय मागितले या प्रकरणी विचारले असता, देवाकडे मागितलेले सांगायचे नसते, असे ती म्हणाली. राणीने काही वर्षांपूर्वी शिर्डीत घर असावे. तेथे तिला घर बांधायचे आहे. तेथे काही मुहूर्त मिळत नाही. शिर्डीत घर कधी बांधणार याविषयी ती म्हणाली की, साईंची ईच्छा असल्यास घर बांधेनही असेही ती म्हणाली. यावेळेस चाहत्यांनी राणीसोबत फोटोही काढला.
मिसेसचॅटर्जी वर्सेस नॉर्वे मधून झळकणार
राणी मुखर्जी हिने मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट 2011 भारतीय वंशाच्या दांपत्यावरील सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटासाठी राणीने या चित्रपटासाठी खूप तयारी केल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या यशासाठीही राणीने साई चरणी प्रार्थना केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details