शिर्डी -मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना ( Ramzan Eid 2022 ) सध्या सुरु आहे. त्यानिमित्त मुस्लिम बांधवांना शिर्डीतील मनसेचे नेते दत्तात्रय कोते यांनी आपल्या निवासस्थानी इफ्तार पार्टीचे आयोजन केले. शिर्डीच्या साईबाबांचा सबका मालिक एकचा संदेश त्यांनी जपला आहे. कोतेंनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित ( MNS Organise Iftar Party ) होते.
एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मशिदीवरील भोंगे उतरविण्यासाठी ( Loudspeaker Controversy ) राज्यात चांगलेच रान उठविले आहे. त्यामुळे मनसे विरुद्ध मुस्लिम असे वातावरण तयार झाले आहे. मात्र, सबका मालिक एकचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीत मनसेने रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. या इफ्तार पार्टीला शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, शिर्डीचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, सलीम शेख, गणीभाई पठाण, बाबाभाई सय्यद, शफीक शेख आदींसह हिंदू-मुस्लीम समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोतेंनी साईबाबांच्या पावनभूमीतून छान संदेश दिला असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.