महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अहमदनगर- वारली चित्रकलेतून साकारले संपूर्ण रामायण, वारली चित्रकार हर्षदा डोळसेंची कलाकृती

अहमदनगरमधील वारली चित्रकलाकार हर्षदा डोळसे यांनी वारली चित्रकलेतून रामायण साकारले आहे. वारलीच्या माध्यमातून हा पहिलाच प्रयत्न असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

वारलीतून साकारले रामायण
वारलीतून साकारले रामायण

By

Published : Apr 5, 2021, 11:55 AM IST

अहमदनगर-हिंदू धर्माचे अधिष्ठान विविध देवदेवतांत असले तरी ते प्रामुख्याने रामायणात दिसून येते, आणि म्हणूनच रामायण कथा या विविध काळात लिहील्या गेल्या. त्यांना जगतमान्यता पण आहे. हाच प्रयोग शिल्प असो की चित्रकला असो यातूनही अधोरेखित होतो. मात्र, आपल्या महाराष्ट्राची लोककला असलेल्या वारली चित्रकलेत रामायण रेखाटण्याचा प्रयत्न नगरच्या वारली चित्रकलाकार हर्षदा डोळसे यांनी केला आहे. वारलीच्या माध्यमातून हा पहिलाच प्रयत्न असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

वारली चित्रकला
आदिवासी भागातील जगतमान्य चित्रकला

वारली चित्रकलेची आपली एक वेगळी ओळख आहे. सह्याद्री डोंगररांगात आणि जंगल परिसरात अधिवास असलेला आपल्या आदिवासी समाजात या चित्रकलेचा जन्म झाला. त्याला ठाणे जिल्ह्यातील वारली चित्रकार जीवा सोमा म्हसे यांनी चित्रकलेला जागतिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न केला. तेथे चित्रकलेला वेगळी ओळख मिळाली. या वारली चित्रकलेच्या प्रेमात अनेक कलाकार असतात, त्यातल्याच एक नगरच्या वारली चित्रकलाकार हर्षदा डोळसे. नगरमधील प्रसिद्ध खडूशिल्पकार, कलाशिक्षक अशोक डोळसे यांच्या पत्नी. डोळसे दांपत्याच्या अशोका आर्ट गॅलरी मध्ये आपणास चित्र-शिल्प प्रकारातील अनेक नाविन्यपूर्ण आणि आकर्षक कलाकृती पहायला मिळतील. यातच वारली चित्रकलेतून साकारले आहे रामायण.

हेही वाचा -सचिन वाझेची बाईक घेतली ताब्यात; एनआयएची कारवाई

रामायणातील प्रमुख दहा प्रसंग..

हर्षदा डोळसे यांनी वारली चित्रकलेतून अनेक कलाकृती साकारल्या आहेत. मुलांना हा चित्रकला प्रकार आवडतो. कारण तो त्रिकोणीय पद्धतीचा असून आकर्षक वाटतो, असे मत डोळसे यांचे आहे. मागील वर्षी पहिल्या लॉकडाऊन मध्ये दूरदर्शनवर रामायण ही प्रसिद्ध मालिकेचे पुर्नप्रक्षेपण झाले. यातून हर्षदा डोळसे यांना वारलीमध्ये रामायण चितारण्याची कल्पना सुचली. त्यांनी मग यावर अभ्यास सुरू केला. रामायणातील प्रमुख प्रसंग कोणते, रामायणाचे वैशिष्ठ काय.. आदी अभ्यास त्यांनी केला. रामायणातील रामजन्म ते कुशलव जन्म असे प्रमुख दहा प्रसंग निवडून एका कॅनव्हास वर ते वारली कलेतून साकारले. अनेक प्रयत्न केल्यानंतर एका कॅनव्हासवर वारली चित्ररामायण त्यांनी पूर्ण केले.

हेही वाचा -औरंगाबाद जिल्ह्यातील मोठ्या ४९ ग्रामपंचायतींमध्ये कोरोना लसीकरण, टेस्टींग शिबिर

अशोका आर्ट गॅलरी..

नगर जिल्ह्यात डोळसे दांपत्य चित्र तसेच शिल्प कलेसाठी प्रसिध्द आहेत. अशोक डोळसे हे एका विद्यालयात कलाशिक्षक आहेत. त्यांची खडू शिल्प प्रसिद्ध आहेत. एका खडूवर त्यांनी अनेक राष्ट्रपुरुष, देव-देवतांना आकार दिलेला आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी शाडूचे गणपती, इतर शिल्प यासाठी ते आग्रही असतात. कला ही पर्यावरण पूरक असायला हवी. आपली तीच परंपरा असल्याचा त्यांचा आग्रह असतो. नवनवीन कलाकारांसाठी कार्यशाळा घेत कलेचा प्रसार डोळसे दांपत्य करते. लॉकडाऊनमध्ये त्यांनी अनेक ऑनलाइन कार्यशाळा घेत कलेची जोपासना करत लोकांना घरात सुरक्षित राहण्याचा आग्रह केला.

ABOUT THE AUTHOR

...view details