महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अहमदनगरमध्ये ईदनिमित्त सामुदायिक नमाज पठण; शांततेसाठी अल्लाहकडे प्रार्थना

नमाज पठणाच्या निमित्ताने अल्लाहाकडे समाजात शांती, बंधुभाव टिकवून ठेवण्यासाठी आणि चांगला पाऊस पडावा यासाठी प्रार्थना करण्यात आली. ईदच्या निमित्ताने मुस्लीम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी हिंदू-शीख-ईसाई धर्माचे धर्मगुरू, नागरिक तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

By

Published : Jun 5, 2019, 5:26 PM IST

अहमदनगरमध्ये ईदनिमित्त सामुदायिक नमाज पठण

अहमदनगर - रमजानच्या अखेरच्या दिवशी चंद्र दर्शनानंतर साजरा होणाऱ्या ईद-उल-फित्र निमित्त आज शहरातील ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठण करण्यात आले. सकाळी १० वाजता शहर खतीब मौलाना सईद अहमद यांच्या उपस्थितीत नमाज पठण करण्यात आले.

अहमदनगरमध्ये ईदनिमित्त सामुदायिक नमाज पठण

यावेळी नमाजासाठी मुस्लीम समाजातील अबाल-वृद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पवित्र रमजानच्या महिन्यातील उपवासानंतर साजऱ्या होणाऱ्या ईदला मोठे महत्व आहे. या निमित्ताने मुस्लीम बांधव गरिबांना दान करून अल्लाहचे आभार मानतात. नमाज पठणाच्या निमित्ताने अल्लाहाकडे समाजात शांती, बंधुभाव टिकवून ठेवण्यासाठी आणि चांगला पाऊस पडावा यासाठी प्रार्थना करण्यात आली. ईदच्या निमित्ताने मुस्लीम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी हिंदू-शीख-ईसाई धर्माचे धर्मगुरू, नागरिक तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. गुलाबपुष्प देऊन यावेळी ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. आमदार संग्राम जगताप, जिल्हा पोलीस अधीक्षक इशू सिंधूसह अधिकारी उपस्थित होते. या सर्वांचे स्वागत सामाजिक कार्यकर्ते उबेद शेख यांनी केले. ईद निमित्ताने आज शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details