अहमदनगर - पाथर्डी येथे युतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या जाहीर सभेत जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी पार्थ पवारांच्या पहिल्या भाषणाची चांगलीच टिंगल उडवली. पार्थ यांच्या भाषणाची नक्कल करत त्यांच्या इंग्लिशबाजाच्या भाषेची टर उडवून राम शिंदे यांनी एकच हशा पिकवला आणि टाळ्यांची दाद मिळवली.
..बोलता येत नाही तर भाषण करता कशाला, राम शिंदेंनी उडवली पार्थ पवारांच्या भाषणाची टिंगल - election
पाथर्डी येथे युतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या जाहीर सभेत जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी पार्थ पवारांच्या पहिल्या भाषणाची चांगलीच टिंगल उडवली.
मंत्री प्रा. राम शिंदे
पार्थ पवार हे मावळात ते मावळणार, असे म्हणत 'बोलता येत नाही तर भाषण करता कशाला' असा टोलाही राम शिंदेंनी लगावला. पंकजा मुंडे आणि मी नशीबवान असल्याचे सांगताना त्यांच्या आणि माझ्या वाट्याला विरोधीपक्ष नेते आले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सुजयला राधाकृष्ण विखे पाटलांचा पाठिंबा असल्याचेही त्यांनी सूचित केले.