महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राम शिंदेही भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक; म्हणाले वरिष्ठ देतील तो निर्णय मान्य.. - अहमदनगर

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यानंतर राज्याच्या भाजप प्रदेशाध्यक्ष स्पर्धेत राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनीही उडी मारली आहे

राम शिंदेही भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक; म्हणाले वरिष्ठ देतील तो निर्णय मान्य..

By

Published : Jun 15, 2019, 10:32 PM IST

अहमदनगर- ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यानंतर राज्याच्या भाजप प्रदेशाध्यक्ष स्पर्धेत राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनीही उडी मारली आहे. वरिष्ठांनी आदेश दिल्यास भूमिका निभावू, असे सांगत राम शिंदे यांनी आपणही प्रदेशाध्यक्ष स्पर्धेत असल्याचे स्पष्ट केले आहे.

राम शिंदेही भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक; म्हणाले वरिष्ठ देतील तो निर्णय मान्य..

विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांनीही या पदासाठी आपले नाव चर्चेत असल्याचे नुकतेच सांगितले आहे. त्यानंतर आज अहमदनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन बैठकीवेळी राम शिंदे यांना प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याचे विचारले असता, त्यावेळी त्यांनी पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारू, असे सूचक उत्तर दिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details