अहमदनगर - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी ग्रामस्थांनी चुलबंद आंदोलन सुरू केले आहे. दुसरीकडे राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीने अण्णांच्या मागण्या पूर्ण होण्याच्या दृष्टीने हालचालींना वेग आल्याचे दिसून येते आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह जलसंपदा मंत्री गिरीश महाजन राळेगणसिद्धीत दाखल झाले आहेत.
राळेगणसिद्धीत आज चुलबंद आंदोलन; मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय कृषीमंत्री दाखल
आंदोलनाची तीव्रता वाढत असताना आता केंद्र आणि राज्य सरकारने हे आंदोलन थांबवण्याच्या दृष्टीने अण्णांच्या मागण्या सकारात्मक घेतल्याचे दिसून येत आहे. अण्णांचे आंदोलन थांबवण्यासाठी मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषीमंत्री राळेगणसिद्धीत दाखल झाले आहेत.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे
विविध खात्यांचे सचिवही राळेगणसिद्धीमध्ये दाखल झाल्याची माहिती आहे. त्या अनुषंगाने पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. एकूणच आंदोलनाची तीव्रता वाढत असताना आता केंद्र आणि राज्य सरकारने हे आंदोलन थांबवण्याच्या दृष्टीने अण्णांच्या मागण्या सकारात्मक घेतल्याचे दिसून येत आहे. कृषिमुल्य आयोगासंदर्भात असलेले अण्णांचे प्रश्न आणि मागण्यांवर सरकारकडून ठोस लेखी आश्वासन मिळाले तर अण्णा आपले आंदोलन थांबण्याची शक्यता आहे.
Last Updated : Feb 5, 2019, 4:18 PM IST