अहमदनगर- राज्यात सर्व आजारांवर दोन महिने पुरेल एवढा औषध साठा आहे. त्यामुळे कोणीही चिंता करण्याचे कारण नसल्याची ग्वाही राज्याचे अन्न व औषध मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली. औषधे, पॅकेज फूड, पीपीई किट, सॅनिटायझर व मास्क आदींचा पुरेसा साठा असल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिले.
राज्यातील २८८ खासगी आणि सहकारी साखर कारखाने सॅनिटायझरची सध्या निर्मिती करत आहेत. त्यामुळे सुरुवातीला काही काळ दिसलेला सॅनिटरयझरचा तुटवडा आता बिलकुल नसल्याचे डॉ. शिंगणे यांनी यावेळी सांगितले.
राज्याचे अन्न व औषध मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हेही वाचा-टीव्हीएस मोटर कंपनीने इंग्लंडमधील 'या' दुचाकी कंपनीची घेतली मालकी
कोरोना विषाणूवर सध्या औषधाचा शोध लागला नाही. त्यासाठी किमान दोन महिने वाट पाहावी लागेल, असे त्यांनी वैयक्तिक मत असल्याचे सांगत स्पष्ट केले. मात्र यासाठी सध्या वापरत असलेल्या औषधांचा पुरेसा साठा आहे, असे ते म्हणाले. अनेक खासगी डॉक्टर सध्या डिजिटल ओपीडी चालवत आहेत. वारंवार हॉस्पिटल सुरू ठेवण्याचे त्यांना आवाहन करूनही प्रतिसाद न मिळाल्याची खंत डॉ. शिंगणे यांनी व्यक्त केली. डिजिटल ओपीडीला परवानगी दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा-कोरोनाच्या संकटात संधी शोधणाऱ्या चीनला बसणार पायबंद; सरकारने काढले हे आदेश
यावेळी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते आदी यावेळी उपस्थित होते.