अहमदनगर:चारचाकी वाहनातून कोण चाललयं, ताफा मंत्र्यांचा आहे की अधिकाऱ्याचा ही बाब टोलटॅक्सकर्मचाऱ्यांना माहिती नसते. राजकीय पक्ष कुठलाही असो, त्यांच्या कार्यकर्त्यांनी अतिरेकपणा थांबवला पाहीजे, असे वाटते. त्यातून शेवटी आपल्याच पक्षाची बदनामी होते. पक्ष नेत्रुत्वानेसुध्दा अश्या कार्यकर्त्यांना समज देणे गरजेचे असल्याे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहे.
दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना मदत:नगर, सोलापूर, खान्देश या भागात पावसाचे प्रमाण अतिशय कमी असून पाऊस व्हावा अशी अपेक्षा सर्वांचीच आहे. पहिली पेरणी आता वाया गेली असली तरी दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना मदत करण्याच्या दृष्टीने सरकारचे नियोजन असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले. बोगस बियाणे तसेच खतांच्या लिंकेज बाबत येणाऱ्या तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन यामध्ये आता प्रचलित कायद्यात बदल करण्याच्या दृष्टीने शासनाने एक पाऊल पुढे टाकले आहे. कृषीमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली यासाठी समितीही नेमण्यात आल्याचे विखे पाटील म्हणाले आहेत.
इर्शाळवाडी येथील घटना दुर्दैवी:इर्शाळवाडी येथील घटना अतिशय दुर्दैवी असून या आपत्तीमधील नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. या संकटात पशुधन दगावलेल्या पशुपालकांनाही मदत करण्याबाबत शासन कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.